";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- जी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन

जी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन

E-mail Print PDF

Add this to your website

Former defense minister George Fernandes passes away in Mumbai

नवी दिल्ली - जॉर्ज फर्नांडिस नावाचे वादळ मंगळवारी सकाळी शांत झाले. ते 88 वर्षांचे होते. फर्नांडिस हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कामगारांचे नेते म्हणून जॉर्ज प्रसिद्ध आहेत. ते पत्रकारही होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉर्ज नगरसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केलेले नेते होते. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजाराने ते दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळलेले होते. अखेरच्या काळात त्यांना काहीही आठवतही नव्हते.

1967 मध्ये पहिल्यांदा बनले खासदार 
3 जून 1930 ला जन्मलेले जॉर्ज कामगार संघटनेते नेते होते. फर्नांडिस 1967 मध्ये तत्कालीन दक्षिण बॉम्बेमधून काँग्रेसच्या एस.के. पाटील यांना पराभूत करून ते पहिल्यांदा खासदार बनले होते. 1975 च्या आणीबाणीनंतर फर्नांडिस बिहारच्या मुजफ्फरपूरमधून खासदार बनले होते. मोरारजी देसाई सरकारमध्ये ते उद्योग मंत्री होते. त्याशिवाय त्यांनी व्हीपी सिंह सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री पदावरही होते. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार (1998-2004) मध्ये फर्नांडीस संरक्षण मंत्री होते. कारगिर युद्धाच्या काळातही ते संरक्षणमंत्री होते.

9 लोकसभा निवडणुकी जिंकले

फर्नांडिस 1967 पासून 2004 पर्यंत 9 लोकसभा निवडणुका जिंकले. आणीबाणीत कते शिखांच्या वेशात फिरत होते. अटकेपासून वाचण्यासाठी ते स्वतःला खुशवंत सिंह असल्याचे सांगायचे.

2003 मध्ये विरोधकांनी कॅगचा हवाला देत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर शवपेटी घोटाळ्याचे आरोप लावले होते. जॉर्ज यांनी त्नेयाला आव्हात देत म्हटले होते, तुम्ही प्रामाणिक असाल तर उद्यापर्यंत मला पुरावा द्या मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने फर्नांडिस यांना या प्रकरणी निर्दोष ठरवले होते.

कैद्यांना ऐकवायचे श्रीमद्भागवतगीता 
फर्नांडिस यांना आणीबाणीदरम्यान बडोदा डायनामाइट केसमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते तुरुंगात कैद्यांना श्रीमद्भागवतगीता ऐकवायचे. फर्नांडिस यांनी संरक्षणमंत्री म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा सियाचीनचा विक्रमी दौरा केला. दिल्लीचे 3, कृष्ण मेनन मार्ग त्यांचे निवासस्थान होते. येथे कोणतेही गेट नव्हते किंवा सुरक्षारक्षकही नसायचे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 75

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds