";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नीरव मोदी वेषांतर करून राहतो 72 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये

नीरव मोदी वेषांतर करून राहतो 72 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये

E-mail Print PDF

Add this to your website
 • Report Says Nirav Modi live in London in 72 Crore rs apartment
   
   
   

  मुंबई/लंडन- पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोप नीरव मोदी लंडनमधील वेस्ट अॅण्‍ड भागात राहत आहे. नीरव याने वेषांतर केले असून तो 72 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे.


  नीरव मोदी हा 13700 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंगचा तपास करत आहे. सुरक्षितेच्या कारणामुळे भारतात येऊ शकत नाही, असे नीरव याने गेल्या महिन्यात विशेष कोर्टाला सांगितले होते.
  इंग्लिश वृत्तपत्र 'टेलीग्राफ'च्या रिपोर्टनुसार, नीरव राहत असलेल्या अपार्टमेंटचे तो प्रतिमहिना 15.5 लाख रुपये भाडे देतो. भारतीय अधिकार्‍यांनी नीरवचे खाते फ्रीज केले आहे. इंटरपोलने नीरवच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटिस बजावली आहे. त्यानंतरही नीरव लंडनमध्ये बिझनेस करत आहे.

  रिपोर्टनुसार, लंडनमध्ये नीरवला नॅशनल इन्श्युरन्स नंबर देखील मिळाला आहे. तसेच तो ब्रिटिश बॅंकेतील अकाउंटचा वापर करत आहे.

  ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग (पीएलएलए) कोर्टात नीरवविरोधात तक्रार दाखल केली आहे. नीरवला फरार घोषित करावे, अशी मागणी ईडीने केली आहे. मात्र, ईडीच्या याचिकेवर पीएमएलए कोर्टाने नीरव यांचे स्पष्टीकरण मागितले आहे.

  ईडीने नीरव मोदीच्या 147.72 कोटी रुपयांची मालमत्ता सीझ केली आहे. मुंबई आणि सुरतमधील मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. यात 8 कार, एक प्लॉट, मशीनरी, ज्वेलरी, पेटिंग आणि स्‍थावर मालमत्तेचा समावेश आहे.

  ऑक्टोबर 2018 मध्ये हाँगकाँगमध्ये नीरव मोदीची 255 कोटी रुपयांची मालमत्ता ‍सीझ करण्यात आली होती. त्याआधी नीरव आणि त्याच्या नातेवाईकांची 637 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती.

  फेब्रुवारी 2018 मध्ये पीएनबी घोटाळा समोर आला होता. त्याअाधीच नीरव मोदी विदेशात पळून गेला होता. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चौकसीने बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्सच्या माध्यमातून बॅंकेतील रक्कम विदेशांत ट्रान्सफर केली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 106

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds