";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- देशातील सर्वात उष्ण शहरांत राज्यातील ९ शहरे

देशातील सर्वात उष्ण शहरांत राज्यातील ९ शहरे

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for sun

 

राज्यात बुधवारपासून आलेली उष्णतेची लाट शुक्रवारी आणखी तीव्र झाली. कोकण वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्र,

विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी पारा ४० अंशांवर राहिला. गेल्या तीन दिवसांपासून जगातील

हॉटस्पॉट बनलेल्या अकोल्यात शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी देशातील १० सर्वात उष्ण शहरांत महाराष्ट्रातील ६ शहरांचा समावेश होता. महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांत येत्या

आठ मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

 • आयएमडी आणि पुणे वेधशाळेच्या अहवालानुसार, शुक्रवारी राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसची वाढ दिसून आली. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून २९ एप्रिलपर्यंत ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा आणि दक्षिण उत्तर प्रदेशात येत्या ८ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील.

  औरंगाबादेत २०१० नंतर एप्रिलमध्ये प्रथमच पारा ४३

  उष्णतेच्या लाटेचा फटका औरंगाबादकरांना बसतो आहे. औरंगाबादेत १७ एप्रिल २०१० रोजी ४३.५ अंश अशी एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. आठ वर्षांनंतर २६ एप्रिल २०१९ रोजी तापमान ४३ अंश नोंदले गेले. २०११ ते २०१८ या काळात एप्रिलमध्ये पारा सातत्याने ४२ अंशांच्या खाली राहिला.

  देशातील सर्वात उष्ण शहरांत राज्यातील ९ शहरे 
  शुक्रवारच्या तापमानाचा विचार करता, देशातील सर्वात उष्ण १० शहरांत राज्यातील सहा शहरांचा समावेश होता. देशात ४६.५ अंश तापमानासह मध्य प्रदेशातील खरगोन सर्वात उष्ण शहर राहिले. त्यानंतर अकोला, वर्धा, चंद्रपूर, परभणी, ब्रह्मपुरी, अमरावती, परभणी, नागपूर, अहमदनगर ही शहरे देशात सर्वाधिक उष्ण राहिली.

  प्रमुख शहरांचे तापमान 
  अहमदनगर ४४.९, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, औरंगाबाद ४३, बीड ४४.२, बुलडाणा ४३.१, चंद्रपूर ४५.६, जळगाव ४४.४, मालेगाव ४३.१, नागपूर ४५.२, नांदेड ४४.२, नाशिक ४१.७, उस्मानाबाद ४३.८, परभणी ४५.७, पुणे ४२.६, सोलापूर ४४.३, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५ अंश सेल्सियस. 

   


 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 77

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds