";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- फनीमुळे आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील जिल्ह्यात पाऊस सुरू

फनीमुळे आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील जिल्ह्यात पाऊस सुरू

E-mail Print PDF

Add this to your website

fani storm hits Puri coastline, heavy rains on

 

भुवनेश्वर(ओडिसा)- चक्रीवादळ फनी ओडिसामध्ये पुरीच्या किनारपट्टीवर धडकले. या वादळामुळे खालच्या परिसरात मुसळधार पाऊसामुळे पाणी भरले आहे. याठीकाणी 175 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ बांग्लादेशकडे जात आहे आणि त्यादरम्यान पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरातही चेतावनी देण्यात आली आहे. ओडिसामध्ये सुरक्षेसाठी 15 जिल्ह्यातील 11 लाखपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित जागेवर हलवण्यात आले आहे. हा ओडिसामधील मागील 20 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ आहे.


इमरजंसी नंबर
ओडिशा- 06742534177, गृह मंत्रालय- 1938, सिक्योरिटी- 182

अपडेट्स...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी 48 तासांसाठी आपल्या सगळ्या रॅली रद्द केल्या आहेत.
कोलकतातही फनीचा परिणाम दिसत आहेत, त्यामुळेच येथही जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
फनीचे मुख्य केंद्र ओडिशामधून पुढे निघत आहे. 
ओडिशामध्ये वादळामुळे दुपारपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितले की, फनीचे मुख्या केंद्र अंदाजे 25 किलोमीटरचे आहे. यामुळेच 150 ते 175 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. काही ठिकाणी हे वारे 200 किलोमीटर वेगाने वाहत आहेत.
एनडीआरएफने एडवायजरीमध्ये म्हटले आहे की- वादळानंतर उद्धवस्त झालेल्या जागेवर जाऊ नका, विजेच्या तारा पडलेल्या असू शकतात. मच्छिमारांनी अतिरीक्त बॅटरीसोबत रेडीओ सेट्स ठेवा. 
एनडीआरएफने प्रभावित क्षेत्रात बचावकार्य सुरू केले आहे.
भुवनेश्वर, बेरहामपूर, बालूगावमध्ये फनीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला आहे.
पुरीसोबतच किनारपट्टीच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
फनीच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनममध्येही जोरदार पाऊसाची सुरुवात झाली आहे.

नौसेनेचे 3 जहाज बचावासाठी तैनात
किनारपट्टी सुरक्षा बलाने सांगितले की, फनीला पाहता 34 बचाव दल आणि चार किनारपट्टी सुरक्षा दलाला तयार करण्यात आले आहे. नौसेनेचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा यांनी दिल्लीत सांगितले की, नौसेनेचे पोत सहयाद्री, रणवीर आणि कदमतला बचावकार्यसाठी पाठवण्यात आले आहे.

5000 किचनची व्यवस्था
एनडीआरएफच्या 28, ओडिसा डिझास्टर मॅनेजमेंट रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 यूनिट आणि फायर सेफ्टी डिपार्टमेंटचे 525 लोग रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आहेत. त्याशिवाय आरोग्य विभागाच्या 302 रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्या आहेत. बचाव शिबीरात जेवण्याच्या व्यवस्थेसाठी 5000 किचन तयार करण्यात आले आहेत.


किनारपट्टी असलेल्या जिल्हायीत येणे-जाणे बंद
किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यात रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतून पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारू मध्यरात्रीपासून बीजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्टवरील सगळी विमान उड्डाने 24 तासांसाठी बंद करण्यात आली आहेत. कोलकता एअरपोर्टदेखील शुक्रवारी रात्रीपासून शनिवार रात्रीपर्यंत बंद असेल.

वादळामुळे ओडिशातील 14 जिल्हे प्रभावित होतील
वादळामुळे ओडिशातील 14 जिल्ह्यात त्याचा परिणाम दिसेल. यात पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाड़ा, बालासोर, भद्रक, गंजम, खुर्दा, जाजपुर, नयागड, कटक, गाजापटी, मयूरभंज, ढेंकानाल आणि कियोंझरचा समावेश आहे. या जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार गावे वादळामुळे प्रभावित होतील. हे वादळ ओडिसानंतर पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. याचा परिणाम आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या उत्तर-पूर्व भागातली दिसेल. बंगालमध्ये पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगना जिल्हे, हावड़ा, हुगली, झारग्राम, कोलकातासोबतच श्रीकाकुलम, विजयनग्राम आणि आंध्रप्रदेशचे विशाखापत्तनमध्येही प्रभाव दिसेल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 55

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds