";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळच्या रणांगणात पवारांचा पार्थ पराभूत

मावळच्या रणांगणात पवारांचा पार्थ पराभूत

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

विजयासाठी सर्वस्वी शेकापवर विसंबून राहिलेल्या महागंठबंधनचे उमेदवार तथा अजीत पवार यांचे सुपुत्र आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांना पराभवाची धुळ चारीत मावळ लोकसभा मतदारसंघातून सेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. पार्थ पवारांचं पार्सल पराभूत करून बारामतीकडे रवाना केल्याचा आणि देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताने सरकार सत्तेवर आल्याचा उरणमध्ये सेना-भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून,फिर एक बार,मोदी सरकारच्या घोषणा देत शहरातून मिरवणूक काढून जोरदार जल्लोष केला.एकीकडे उरणमध्ये सेना-भाजप कार्यकर्त्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा करीत असताना दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मनसे आदी राजकीय पक्षाच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.

Image result for parth pawar

 

मावळची जागा पवार घराण्यामुळे प्रतिष्ठेची बनली होती.पार्थ पवार यांच्या विजयासाठी शरद पवारांसह अजित पवारांचे अख्खे कुटुंब आणि राज ठाकरे, धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडविला होता.तर दुसऱ्यांदा खासदारकीची लढविणाऱ्या सेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे,युवा अध्यक्ष ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार प्रचार करीत नवख्या पार्थ पवारांचं पार्सल बारामतीकडे रवाना करण्याचे आवाहन केले होते.सेना-भाजपच्या आणि केंद्रात पुनश्च मोदी सरकार या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अखेर पार्थ पवारांचं पार्सल बारामतीकडे रवाना केले आहे.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत शेकापने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देऊन मनसेच्या साथीने निवडणूक लढवली होती.मात्र सेनेचे श्रीरंग बारणे यांनी जगताप यांना पराभूत केले होते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघातील महागठबंधनचे उमेदवार पार्थ पवार यांच्या विजयाची सर्वस्वी जबाबदारी शेकापवर सोपवली होती.मात्र शेकापवर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडता आलेली नाही. पार्थ पवारांचं पार्सल पराभूत करून बारामतीकडे रवाना केल्याचा आणि देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताने सरकार सत्तेवर आल्याचा उरणमध्ये सेना-भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, फिर एक बार, मोदी सरकारच्या घोषणा देत शहरातून मिरवणूक काढून जोरदार जल्लोष केला.यामध्ये महेश बालदी, नरेश रहाळकर आणि सेना-भाजपचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 70

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds