";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह लवकरच भाजप प्रवेश

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह लवकरच भाजप प्रवेश

E-mail Print PDF

Add this to your website

 

Senior Congress leader Radhakrishna Vikhe Patil Resigns as MLA

मुंबई - भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विखे पाटलांनी आपला राजीनामा मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सुपूर्द केला. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे. त्यातच राजीनामा दिल्यानंतर आता भाजप प्रवेशाच्या हालचालींना आणखी वेग आला आहे. ते काँग्रेसच्या इतर काही बंडखोर आमदारांसह भारतीय जनता पक्षात जाणार असे सांगितले जात आहे.


राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांनी लोकसभा निवडणुकीत 2.81 लाख मतांनी विजय मिळवला. मुलाने भाजपची वाट धरल्याच्या अवघ्या काही दिवसांतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची तारीख समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 50

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds