";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 10 वीचा निकाल जाहीर; सरासरी 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

10 वीचा निकाल जाहीर; सरासरी 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुंबई / पुणे / औरंगाबाद - राज्यात एसएससी अर्थात दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. यावर्षी 12 लाख विद्यार्थी पास झाले असून एकूणच उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींची आकडेवारी 77.10 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 12 टक्क्यांनी कमी लागला आहे. नेहमी प्रमाणेच यावेळी सुद्धा मुलींनी बाजी मारली. तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के लागला आहे.

बोर्डानिहाय निकालाची टक्केवारी पाहिल्यास नेहमीप्रमाणेच कोकणचा निकाल 88.38 टक्क्यांसह टॉपवर आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी आला आहे. पुणे 82.48%, नागपूर 67.27%, औरंगाबाद 75.20%, मुंबई 77.04%, कोल्हापूर 86.58%, अमरावती 71.98%, नाशिक 77.58% आणि लातूर बोर्डाचा निकाल 72.87% इतका लागला आहे. आपणही बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकता.

एसएमएसने सुद्धा जाणून घेता येईल
विद्यार्थ्यांना एका SMS च्या माध्यमातून सुद्धा आपल्या निकालाची माहिती मिळवता येईल. यासाठी बीएसएनएल यूजर्सला आपल्या मोबाईलवर MHSSC (स्पेस) (आसन क्रमांक) लिहून 57766 वर पाठवावे लागेल.

17 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने 1 मार्च ते 22 मार्च पर्यंत दहावीची परीक्षा घेतली होती. यामध्ये 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गतवर्षी दहावीचे निकाल 8 जूनला घोषित करण्यात आले होते. गेल्यावर्षीच्या निकालाची सध्याच्या निकालाशी तुलना केल्यास 12 टक्क्यांचा फरत दिसून येतो. गतवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 89.41 टक्के होते.

10 जूनपासून मिळवू शकता उत्तरपत्रिकांच्या प्रत
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी 10 जूनपासून मिळवता येऊ शकतील. यासाठी सर्वच फॉर्म ऑनलाइन उपलब्ध राहतील. 10 जून ते 19 पर्यंत फेरपरीक्षेसाठी आणि 10 जून ते 29 पर्यंत उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले जाऊ शकतील.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 57

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds