";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for dabholkar

पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. डॉ. दाभोळकर प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने(सीबीआय) न्यायवैद्यकीय चाचणी केली, त्यात त्याने साथीदार सचिन अंदुरेनेसोबत मिळून दाभोळकरांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.

सीबीआयने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार न्यायवैद्यकीय चाचणीद्वारे कळसकरने पुनाळेकरांच्या सल्ल्यानेच गुन्ह्यातील शस्त्रे नष्ट केल्याचे कबुल केले. चाचणीत कळसकर म्हणाला, "मागील वर्षी जून महिन्यात मी अॅड. पुनाळेकरांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकरांनी दाभोळकर हत्येत वापरलेली शस्त्रे नष्ट करण्यास सांगितले होते."

दरम्यान, सीबीआयने दाभोळकर हत्या प्रकरणात आरोपी कळसकरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी अटक केली होती. त्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप देखील सीबीआयने ताब्यात घेतले आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 61

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds