";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सगळ्या प्रवाशांची सुटका, बचावकार्य संपले

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सगळ्या प्रवाशांची सुटका, बचावकार्य संपले

E-mail Print PDF

Add this to your website

 

वांगणी स्थानकाजवळ पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये जवळपास 700 प्रवासी अडकलेले होते. या सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुपारी 2.15 च्या आसपास या प्रवाशांची सुटका करण्यात आली.सुरुवातीला या गाडीतील 7 प्रवाशांनी जीवघेणं धाडस करत गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला होता. सुदैवाने कोणालाही अनिष्ट गोष्टींचा सामना करावा लागला नाही. हे सगळे जण सातारा आणि कोल्हापूरचे रहिवासी आहेत.11.45 च्या सुमारास एनडीआरएफचे पथक महालक्ष्मी एक्सप्रेसजवळ पोहोचले आणि त्यांनी प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. महिला आणि लहान मुलांना त्यांनी प्राधान्य दिलं असून रबराच्या बोटीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप ठिकाणी पोहचवण्यास सुरूवात झाली.अडकलेल्या प्रवाशांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश होता. या गर्भवती महिलांमधील एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याने गाडीतील सगळेच प्रवासी चिंताग्रस्त झाले होते. ही बाब बचाव पथकाला कळवल्यानंतर घटनास्थळी 37 डॉक्टरांची टीम , अँम्ब्युलन्स आणि इतर यंत्रणा पाठवण्यात आली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds