";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कोल्हापूर-सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले अभिनेते नाना पाटेकर, शिरोळमध्ये केली जाणार 500 घरांची बांधणी

कोल्हापूर-सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले अभिनेते नाना पाटेकर, शिरोळमध्ये केली जाणार 500 घरांची बांधणी

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for नाना पाटेकर

एंटरटेन्मेंट डेस्क : राज्यातील कोल्हापूर-सांगली भागात महापूराने थैमान घातले होते. पूर ओसरत असला तरी येथील परिस्थिती सावरण्यास वेळ लागणार आहे. सध्या विविध संस्था, दानशूर व्यक्ती. सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अनेक सिनेसृष्टी आणि टीव्ही कलाकारांनीही खूप मदत केली आणि करत आहेत. नाना पाटेकर शिरोळ पुरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आले होते. येथे नागरिकांना यथोचित भोजन देण्यात आले. दरम्यान तेथील महिलांनी आपले दुःख नानांसमोर व्यक्त करण्यासाठी त्यांना घेराव घातला. नानांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

नाना पाटेकर म्हणाले, 'आम्ही शिरोळ येथे 500 घरे बांधणार आहोत. त्यानंतर टाकळीवाडीलाही 3000 घरे बांधली जाणार आहेत. तसेच कोल्हापूर सांगलीच्या इतर विभागातही घरे बांधली जाणार आहेत. सरकारसोबत मिळून हे काम मी करणार आहे. यामध्ये कुणाही एकाचे श्रेय नाही आणि त्याने ते घेऊही नये. शासनासोबत राहून नागरिकांना सर्व मदत केली जय. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये.' असेही नाना पाटेकरांनी सांगितले. याबरोबरच नानांनी इतर नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds