";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अरुण जेटलींची प्रकृती खालावली, एम्स रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत जेटली

अरुण जेटलींची प्रकृती खालावली, एम्स रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत जेटली

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for jetali

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती शनिवारी आणखी खालावली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची त्यांची भेट घेतली. यानंतर शनिवारी बसप प्रमुख मायावती यांनी देखील रुग्णालय गाठले. तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील रुग्णालयात जाऊन जेटलींची विचारपूस केली. जेटली यांना श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने त्यांना 9 ऑगस्ट रोजीच एम्समध्ये दाखल करण्यात आले.

जेटलींना नेमके काय झाले?

जेटलींना ईसीएमओ (एक्स्ट्रा-कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) वर ठेवण्यात आले आहे. यालाच लाइफ सपोर्ट देखील म्हटले जाते. दीर्घकाळ पर्यंत हृदय आणि श्वास सुरू ठेवण्यात मदत करण्यासाठी या उपकरणांचा वापर केला जातो. ज्यांचे हृदय आणि श्वसन यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही त्यांच्यासाठी ही सिस्टिम अत्यंत आवश्य मानली जाते. एम्स रुग्णालयाने 9 ऑगस्ट रोजी एक हेल्थ बुलेटीन जारी केले होते. त्यानंतर जेटलींच्या आरोग्यावर काहीच अपडेट अधिकृतरित्या समोर आलेले नाहीत. डॉक्टरांची एक टीम सातत्याने जेटलींची काळजी घेत आहे. जेटली यांच्यावर सॉफ्ट टिश्यू कॅन्सर संदर्भात उपचार सुरू होते. याच आजारामुळे त्यांना 13 जानेवारी रोजी उपचारासाठी न्यूयॉर्कला जावे लागले. यानंतर फेब्रुवारीमध्ये ते देशात परतले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 56

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds