";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- चिदंबरम पिंजऱ्यात..., भ्रष्टाचाराच्या प्रकरणात

चिदंबरम पिंजऱ्यात..., भ्रष्टाचाराच्या प्रकरणात

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for chidambaram

 

बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडीनंतर माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांच्या जाेरबाग येथील निवासस्थानी भिंतीवर चढून प्रवेश करत सीबीआयच्या पथकाने रात्री ९.४५ वाजता त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात नेले. तत्पूर्वी, चिदंबरम यांच्या वतीने १२ वकिलांची फौज दिवसभर कोर्टात धावपळ करत राहिली, परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही. अटक टाळण्यासाठी २७ तास बेपत्ता असलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम बुधवारी रात्री ८.१० वाजता अचानक काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यासाठी आले. त्यांनी दावा केला की, मी व माझ्या मुलाने गुन्हा केलेला नाही. १० मिनिटे काँग्रेस कार्यालयात थांबून चिदंबरम त्यांच्या जोरबाग येथील घरी गेले. त्यानंतर सीबीआय व ईडीचे अधिकारी काँग्रेस कार्यालयात पोहोचले. तेथून सीबीआय आणि ईडीची पथके चिदंबरम यांच्या निवासस्थानी गेली. तेथे जवळपास दोन तास झालेल्या नाट्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चिदंबरम यांना रात्री सीबीआयच्या मुख्यालयात ठेवले जाईल.

अायएनएक्स मीडिया लाच प्रकरण 
सुप्रीम कोर्ट : सकाळी १०.३० ते सायं. ४.१५ पर्यंत सिब्बलसह १२ ज्येष्ठ वकील चिदंबरम यांचा अटकेपासून बचाव करण्यासाठी सुप्रीम कोर्टात प्रयत्न करत राहिले. मात्र, सुनावणी झाली नाही. कोर्टाने दोन दिवसांनंतरची तारीख दिली.

सुप्रीम कोर्टात डाळ शिजली नाही, अखेर २७ तासांपासून बेपत्ता चिदंबरम प्रकटले, २ तासांनी अटक 
- काँग्रेस मुख्यालय : चिदंबरम रात्री ८.१० वाजता पोहोचले. म्हणाले, प्रकरणात माझे नावही नाही; ८ मिनिटे बोलले... निघून गेले. २७ तासांपासून बेपत्ता चिदंबरम काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत म्हणाले, माझ्याविरुद्ध गुन्ह्याचा आरोपच नाही. आरोपपत्र नाही. जीवन आणि स्वातंत्र्य यात एकाची निवड करायची असेल तर मी स्वातंत्र्य निवडेन.' 
- िचदंबरम यांचे घर : ८.३० वाजता ते घरी आले, सीबीआय पथक भिंतीवर चढून घुसले. ९.४५ वाजता ताब्यात घेऊन निघून गेले. ८.४० वा. सीबीआय पथक पोहोचले. गेट उघडले नाही म्हणून हे पथक भिंत चढून घुसले. भाजप कार्यकर्तेही पोहोचले. दरम्यान, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत जुंपली. गर्दीला पांगवून सीबीआय पथक चिदंबरम यांना घेऊन गेले.
- सीबीआय मुख्यालय: सीबीआय पथक ९.४५ वा. चिदंबरम यांना घेऊन पोहोचले, १०.०० वा. औपचारिक अटक झाली. चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणी. त्यानंतर चौकशी सुरू. सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये सुईट ५ मध्ये त्यांना ठेवण्यात आले. बाहेर प्रचंड बंदाेबस्त असून निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याचे बंब सज्ज ठेवण्यात आले.

- चिदंबरम यांना कोर्टासमोर आज हजर करून सीबीआय १४ दिवसांचा रिमांड मागेल, चिदंबरम जामीन मागू शकतात 
- चिदंबरम यांचे निर्दोषत्व त्यांना अस्वस्थ करत आहे, त्यामुळेच त्यांना लज्जास्पद पद्धतीने सावज केले आहे : प्रियंका गांधी 
- चिदंबरम मल्ल्या, नीरव मोदींच्या पलायनाचा मुद्दा उपस्थित करत, मग स्वत: का पळाले ? कायद्याला सामोरे जावे लागेल : भाजप

८ वर्षांपूर्वी चिदंबरम ज्या सीबीआय मुख्यालयाच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे होते, तेथेच आता कैदेत 
चिदंबरम यांना ताब्यात घेऊन सीबीआय मुख्यालयात आणण्यात आले. या मुख्यालयाचे उद्घाटन ३० एप्रिल २०११ रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले होते. चिदंबरम त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांची कायदेशीर बाजू सांभाळणारे कपिल सिब्बलही तेव्हा उपस्थित होते.

भास्कर इनसाइड 
हेमंत अत्री/मुकेश काैशिक | नवी दिल्ली 
सोनियांच्या सांगण्यावरून सामोरे जाण्याचा चिदंबरम यांचा निर्णय 
निवडणुकीत दारुण पराभवानंतर सैरभैर झालेल्या काँग्रेस पक्षात प्रथमच एकजूट दिसून आली. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी होणार हे निश्चित झाल्यावर कपिल सिब्बल यांनी अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांना कळवले. सोनियांनी रणनीती आखली आणि फरार राहण्याऐवजी परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला. पत्रकार परिषद घेण्याचे सायं. ६.३० वा. ठरले. ७ वाजता फोनवर सोनियांनी सांगितले की, चिदंबरम हे पण पत्रकार परिषदेत असले पाहिजेत. याअगोदर चिदंबरम यांनी यावे की नाही याचा उल्लेख नव्हता. आता काँग्रेस हा राजकीय सूड असल्याचा मुद्दा म्हणून वापरण्याच्या मानसिकतेत आहे. गुरुवारपासून मोठ्या प्रमाणात निदर्शनांची तयारी झाली.

सुप्रीम काेर्ट लाइव्ह 
अटक टाळण्यासाठी १२ दिग्गज वकिलांची धावपळ व्यर्थ 
चिदंबरम यांच्या वतीने कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद यांच्यासह १२ वकील सुप्रीम कोर्टात आले. न्या. एन. व्ही रमणा यांच्यासमोर चिदंबरम यांची अटक टाळण्याची मागणी केली. पीठाने सुनावणीस नकार दिला.

वकील रजिस्ट्रारकडे गेले व याचिका तत्काळ सरन्यायाधीशांकडे पाठवण्यास सांगितले. रजिस्ट्री कार्यालयाने त्यात त्रुटी दर्शवल्या. दुपारी २ वाजता वकिलांची फौज पुन्हा एकदा न्या. रमणा यांच्यासमोर आली. ते म्हणाले, लिस्टिंग सरन्यायाधीश करतील. लिस्टिंगपूर्वी सुनावणी होणार नाही.

दु.३.४० वाजता वकील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कोर्टात आले. अयोध्या प्रकरणाची सुनावणी संपेपर्यंत त्यांना २० मिनिटे थांबावे लागले. ४ वाजता वकिलांनी बाजू मांडण्याचा विचार बदलला. त्यांना रजिस्ट्रारनी सांगितले की, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होईल. 

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 49

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds