";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन

माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन

चेन्नई - निवडणूक आयोगाला वेगळी ओळख देणारे देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. अर्थात तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन (८७) यांचे रविवारी चेन्नईमध्ये निधन झाले. १५ डिसेंबर १९३२ रोजी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात जन्मलेले शेषन १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ या काळात निवडणूक आयुक्त होते.

भारतीय निवडणूक प्रक्रियेत शेषन यांनी Eमूलाग्र बदल केले. राजकीय नेत्यांमध्ये धडकी भरवणारे शेषन यांनी मतदार ओळखपत्राची सुरुवात केली. १९९६ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९२ मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकीत शेषन यांनी सुमारे ५० हजार गुन्हेगारांना एक तर अटकपूर्व जामीन घ्या किंवा स्वत:ला पोलिसांच्या हवाली करा, असा पर्याय दिला होता. मतदान केंद्र लुटण्यासाठी कुख्यात असलेल्या बिहारमध्ये शेषन यांनी १९९५ मध्ये प्रथमच नि:पक्ष निवडणूक घेतली.

असे झाले निवडणूक आयुक्त...

शेषन यांचे आत्मचरित्र “शेषन -अॅन इंटिमेट स्टोरी’ लिहिणारे के. गोविंदन यांच्यानुसार, डिसेंबर १९९० मध्ये रात्री एक वाजता केंद्रीय वाणिज्यमंत्री सुब्रमण्यम स्वामी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचे दूत म्हणून शेषन यांच्या घरी गेले. निवडणूक आयुक्तपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. यावर शेषन यांनी काही लोकांचा सल्ला घेऊ, असे कळवले. शेषन रात्री राजीव गांधी यांना फोन करून भेटण्यासाठी गेले. राजीव गांधी यांनी या प्रस्तावाला होकार दर्शवल्यावर ते शेषन यांना सोडण्यासाठी गेटपर्यंत आले. गेटवर राजीव गांधी म्हणाले, “तुम्हाला निवडणूक आयुक्त करण्याचा निर्णय घेणारा तो दाढीवाला माणूस हा दिवस कायम लक्षात ठेवेल...’ तो दाढीवाला माणूस म्हणजे चंद्रशेखर होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 55

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds