";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मराठी साहित्यिकांचाही विराेध, भारतीयत्वाचा अनादर करणाऱ्या सरकारचा निषेध

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मराठी साहित्यिकांचाही विराेध, भारतीयत्वाचा अनादर करणाऱ्या सरकारचा निषेध

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विराेध करण्यासाठी देशभरात अांदाेलने पेटलेली असताना महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनीही या कायद्याविराेधात एकजूट दाखवली अाहे. 'अांदाेलकांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा अाम्ही मराठी साहित्यिक तीव्र निषेध करतो. सरकारने हा कायदा तातडीने मागे घ्यावा,' अशी मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली अाहे.

या कायद्याद्वारे पाक, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांतील धार्मिक छळाला कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, पारशी, बौद्ध व जैन स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी अटी विशेष शिथिल करण्यात अाल्या अाहेत. असे 'सरसकट' नागरिकत्व देण्याने आमच्या वांशिकतेला, अस्मितेला बाधा उत्पन्न होईल, बेकायदेशीर स्थलांतरितांना आमच्या प्रदेशात सहज वाव मिळेल, या भूमिकेतून ईशान्य भारतासह देशभरातून तीव्र विराेध हाेत अाहे. मुस्लिम स्थलांतरितांना यातून वगळले आहे व केवळ मुस्लिम शेजारी देशांमधील इतर धर्मीय अत्याचारित अल्पसंख्याकांचाच विचार यात करण्यात आलेला आहे, यातून भारताच्या नागरिकत्वाला धार्मिकतेचा गडद रंग दिला जातोय, असा अाराेपही साहित्यिकांनी केला .

या पत्रकावर अवधूत डोंगरे, जयंत पवार, नीरजा, सतीश तांबे, राजीव नाईक, रवींद्र लाखे, अजय कांडर, डायस, संतोष पवार, फेलिक्स डिसोझा, मंगेश बनसोड, येशू पाटील, प्रज्ञा चंद्रकांत पाटील, पंकज कुरुलकर, प्रफुल्ल शिलेदार, शांता गोखले, सतीश आळेकर, संध्या नरे पवार, राजन खान, मंगेश काळे, मुकुंद टांकसाळे, सुबोध जावडेकर, श्रीकांत देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, अरुण खोपकर, दत्ता पाटील, दिलीप जगताप, राजन गवस, इग्नेशियस पवार, बालाजी सुतार आदी साहित्यिकांची नावे अाहेत.

विराेध ठेचून काढण्याचा डाव : सरकारवर आरोप

देशातील मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सतत युद्धग्रस्त स्थिती असल्यासारखी विधाने करणे, 'देशद्रोही' संबोधणे आणि विशिष्ट घटकांमधील नागरिकांना स्वतःच्या नागरिकत्वाविषयी अस्थिरता वाटायला लावणे, ही विषण्णकारी परिस्थिती आहे. या परिस्थितीची सरकार गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही. जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीमाराचा अाम्ही निषेध करताे, असेही साहित्यिकांनी म्हटले.

भाजप सरकार मांडतेय 'भारतीय' असण्याचा संकुचित अर्थ

शेजारी राष्ट्रांच्या संदर्भात स्वतःचे राष्ट्रीयत्व ठरवणारी भाजपची वृत्ती एकंदरच भारतीयत्वाला काळिमा फासणारी आहे. 'हिंदू' असण्याचा स्वतःचा संकुचित अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्षे मांडत आला आहे, आता 'भारतीय' असण्याचा असाच संकुचित अर्थ भाजपचे सरकार मांडत आहे, त्यानुसार राज्यघटनेत बदल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे, असा अाराेपही साहित्यिकांनी केला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 43

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds