";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पुणे मेट्रोचे उद्घाटन; 3 महिने ट्रायल सुरू राहणार, महामेट्रोसाठी नागपूर येथून मागवण्यात आले कोच

पुणे मेट्रोचे उद्घाटन; 3 महिने ट्रायल सुरू राहणार, महामेट्रोसाठी नागपूर येथून मागवण्यात आले कोच

E-mail Print PDF

Add this to your website

 

पुणे : वाढत्या बाहतुकीवरील भार कमी करण्याच्या हेतूने उभारण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सुरुवातीच्या मेट्रो मार्गाचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी पिंपरी येथे करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील संत तुकारामनगर ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सुरुवातीला धावणार आहे. सरुवातीचे तीन महिने ट्रायल रन सुरू राहतील. त्यानंतर मेट्रोच्या नियमित फेऱ्यांसाठीची प्रमाणपत्रे मिळतील. त्यानंतर मेट्रो सर्वार्थाने प्रवाशांसाठी सज्ज होईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

येत्या तीन महिन्यांत मेट्रोची रेल्वे बोर्ड,आरडीएसओ आणि सीएमआरएस यांच्याकडून तपासणी होणार आहे. तपासणीनंतरच या तीन संस्था मेट्रो सुरू करण्याबाबतचे प्रमाणपत्र महामेट्रोला देतील. त्यानंतर मेट्रो नियमितपणे सुरू होईल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.

महामेट्रोसाठी नागपूर येथून कोच (बोगी) मागवण्यात आले आहेत. २९ डिसेंबरला हा संच पुण्यात दाखल झाला होता. तो ३० डिसेंबरला क्रेनच्या साहाय्याने उन्नत मार्गावर चढवण्यात आला. वर्षाखेरीस जाहीर केल्यानुसार मेट्रोचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

असे आहेत कोच

  • नारंगी, निळ्या व जांभळे पट्टे असणार आहेत.
  • हे रंग उत्साह, निष्ठा, चातुर्य, आनंदाचे प्रतीक
  • महिलांसाठी स्वतंत्र कोच, त्यावर गुलाबी पट्टे
  • छत्रपती शिवरायांची सिंहासनाधीन प्रतिमा
  • कोचवर शनिवारवाडा, फुले मंडई, तापुरा यांची चित्रे
  • एका मेट्रोची प्रवासी क्षमता सुमारे ९०० आहे.
  • कोचमध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे असतील.
  • इतर सुविधाही असतील.
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 25

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds