";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तीन महानगरे मेट्रोपॉलिटन ट्रॅकवर! पुणे, नागपूर, मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास नव्या वर्षात आणखी सुखकर

तीन महानगरे मेट्रोपॉलिटन ट्रॅकवर! पुणे, नागपूर, मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास नव्या वर्षात आणखी सुखकर

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

पुणे : वाढत्या वाहतुकीला पर्याय म्हणून नागपूर, पुणे या शहरांसाठी राज्यात महामेट्रो प्रकल्पाची घोषणा २०१६ मध्ये करण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महामेट्रो) स्थापना करण्यात आली. जगभरातील मेट्रो व्यवस्थेचे एक मॉडेल समोर ठेवून महामेट्रोला सुरुवात करण्यात आली. शहरांतील मर्यादित लांबी-रुंदीच्या रस्त्यांवरील सातत्याने वाढणारा वाहतुकीचा बोजा आणि त्यातून वाढणारा प्रवासवेळ तसेच प्रदूषण यावर मार्ग म्हणून मेट्रोला प्राधान्याने मान्यता देण्यात आली.

11,420 कोटींचा खर्च

पुणे मेट्रोसाठी प्रकल्पासाठी सुमारे ११ हजार ४२० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महामेट्रो अंतर्गत येणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकारांनी निम्मा-निम्मा करण्याचे ठरलेले आहे. त्यासाठी रीतसर निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन कामाला सुरुवात आली आहे. अनेक टप्प्यांत हे काम होत आहे.

पहिल्या टप्प्यात येथे सुविधा

 • स्वारगेट ते पुणे मनपा, वनाज ते रामवाडी हे दोन प्रमुख मार्ग प्रस्तावित. संत तुकारामनगर ते फुगेवाडी मार्ग पहिल्या सहामाहीत सुरू होईल.
 • सहा बोगी दाखल झाल्या आहेत. हे डबे उन्नत मार्गावर चढविण्यात येणार आहेत. त्यानंतर चाचण्या सुरू होतील. सहा महिन्यांच्या अवधीत प्रत्यक्ष मेट्रो सेवा नागरिकांना खुली होईल.
 • सध्या मेट्रो स्टेशन्स (थांबे), अॅप्रोच रोड, विद्युत लाइन्स आदी कामे प्रगतीपथावर आहेत.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची लवकरच सुटका

 • 19 तास दररोज मेट्रो धावणार
 • 31 किलोमीटर ताशी वेग असेल
 • 11,420 कोटी रुपयांचा खर्च

आता नागपूरकरही झोकात करणार महामेट्रोतून प्रवास

रमाकांत दाणी / नागपूर : नागपुरात वेगवान वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो प्रकल्पाचा पाया रचण्यात आला. २०१९ मध्ये खापरी ते सीताबर्डी हा मार्ग व्यावसायिक वाहतुकीसाठी सुरूही झाला. आता लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यानचा मार्ग २०२० मध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील पुढच्या भागाचे कामही सुरू आहे. डिसेंबर २०२० मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

 • या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर होत असल्याने देशातील मेट्रो प्रकल्पांमधील सर्वात हरित प्रकल्प.
 • नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून त्यावर अद्याप काम सुरू झालेले नाही.
 • 38.21 किलोमीटर लांबी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची
 • 8,860 कोटी रुपये या प्रकल्पाची मूळ किंमत आहे.

सुमारे १६ लाख मुंबईकर करतील मेट्रो - २ ए तसेच मेट्रो - ७ चा वापर

मुंबई : मेट्रो - २ ए दहीसर ते डीएन नगर आणि मेट्रो - ७ दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर धावणार आहे. २०२० मध्ये हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे १६ लाख मुंबईकरांकडून त्याचा वापर केला जाऊ शकतो. या दोन्ही मेट्रोच्या माध्यमातून ३५.१ किमीचा मार्ग मेट्रोच्या जाळ्यात येईल. आरे येथील मेट्रो कारडेपोचे कामही २०२० मध्ये केले जात आहे.

  • 110 कोटी रुपये खर्च या कामांसाठी अपेक्षित आहे.
  • 65% काम मेट्रो - २ एचे पूर्ण झाले.
  • 68% काम मेट्रो - ७चे पूर्ण झाले.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 33

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds