";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- हे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही तर तडजोड करुन सत्तेवर आलेले सरकार आहे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

हे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही तर तडजोड करुन सत्तेवर आलेले सरकार आहे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई - आज भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलनं होत आहेत. मुंबईत आझाद मैदानात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण करताना, उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीका केली. महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल त्यांनी केला. तर हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तडजोड करुन सत्तेवर आलेलं सरकार आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवर वाढत्या अत्याचाराबाबत भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. आझाद मैदानावरील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाच्या विश्वासघाताची आम्हाला चिंता नाही, आम्ही लढणारे आहोत, पुन्हा मैदानात जाऊन राज्य परत मिळवू. राज्यात जे सरकार आलं आहे, ते जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारने सुरू ठेवली आहे. 25 हजार हेक्टरीबाबत काय झालं सांगा उद्धवजी, बांधावर जाऊन तुम्ही घोषणा केली होती. बांधावर जाऊन 25 हजार हेक्टरी मदतीची घोषणा कुणाची होती? सांगा उद्धवजी, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

पीडितेला गृहमंत्र्यांनी दोषी ठरवणे वाईट बाब

राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गृहमंत्री एक तरी वक्तव्य केलं का? औरंगाबाद मधील पीडितेला गृहमंत्री दोषी ठरवत असतील हे वाईट आहे. दिशा कायदा करणार तेव्हा करा पण आधी महिला भगिनींना सुरक्षा द्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. जी पीडित असेल तिलाच दोषी ठरवण्याचं काम सुरु असेल. तर मग आम्ही काय करायचं.? महिला अत्याचाराची दररोज एखादी घटना घडते. नराधमांना फासावर चढवण्याची हिंमत कधी येणार आहे.

फडणवीसांनी वारीस पठाण यांच्यावरही केला हल्लाबोल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस अपमानित करत आहे. याठिकाणी सावरकर यांचं नाव घेणारे सत्तेसाठी काही बोलत नाही. कोणी तरी म्हणतो 100 कोटी वर 15 कोटी भारी आहे, वारीस का लावरीस. त्याला सोडणार नाही. सेना फक्त मूक गिळून बसली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अब की बार बाप-बेटे की सरकार, सुधीर मुनगंटीवार यांची टीका

यावेळी अब की बार बाप-बेटे की सरकार, अशी जोरदार टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे सरकार स्थगिती सरकार असल्याचे ते म्हणाले. मागील सरकारच्या योजनांची चौकशी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला आव्हान दिले. कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. मागील सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 33

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds