";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- निर्भयाच्या सर्व दोषींना 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता होणार फाशी, अंतिम डेथ वॉरंट जारी

निर्भयाच्या सर्व दोषींना 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता होणार फाशी, अंतिम डेथ वॉरंट जारी

E-mail Print PDF

Add this to your website

 

नवी दिल्ली - निर्भयाच्या चारही दोषींच्या विरोधात अखेर दिल्लीच्या कोर्टाने शेवटचे डेथ वॉरंट गुरुवारी जारी केले आहे. त्यानुसार, सर्वांना 20 मार्च रोजी पहाटे ठीक 5:30 वाजता फासावर लटकवले जाणार आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेला हा चौथा वॉरंट असून तोच अंतिम राहील असे मानले जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळली. त्यानंतर दिल्ली सरकार नवे डेथ वॉरंट जारी करण्यासाठी पतियाळा हाऊस पोहोचले होते. याच कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी चारही दोषींना नोटिस जारी करून गुरुवारपर्यंत उत्तर मागितले होते.

यापूर्वी तीनदा रद्द झाले डेथ वॉरंट...

1. 22 जानेवारीला सकाळी 6 वाजता फाशी होणार होती, पण टाळली गेली.

2. 1 फेब्रुवारीला फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले गेले, पण फाशी झाली नाही.

3. 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार होती, पण आरोपी पवनकडे कायदेशीर पर्याय बाकी असल्यामुळे फाशी टाळली गेली.

16 डिसेंबर 2012 : 6 आरोपींनी निर्भयासोबत केले होते दुष्कृत्य...

दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थिनीसोबत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 6 लोकांनी चालत्या बसमध्ये दुष्कृत्य केले होते. गंभीर जखमांमुळे 26 डिसेंबरला सिंगापुरमध्ये उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या 9 महिन्यानंतर म्हणजेच 2013 मध्ये लोअर कोर्टाने 5 आरोपी... राम सिंह, पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये हायकोर्ट आणि मे 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. ट्रायलदरम्यान मुख्य दोषी राम सिंहने तिहार जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणखी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे 3 वर्षात सुधारणा गृहात राहून मुक्त झाला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 44

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds