";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कोरोना व्हायरसबाबत नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

कोरोना व्हायरसबाबत नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई - देशासह आता महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरस पोहोचला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि मेसेज वाचून घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वच्छता ठेवा आणि काळजी घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आल्यास कुणीही स्वतःची बुद्धी वापरून औषधे घेऊ नका. कुठलेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टराचा सल्ला आवश्य घ्या असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

पुण्यात 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. तर नाशिक आणि कोल्हापूरसह बीडमध्ये सुद्धा संशयित रुग्ण सापडले. मुंबईत सापडलेल्या संशयित रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास चिंतेची बाब आहे. याचा अर्थ कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. "लोकांना माझे आवाहन आहे की घाबरुन जाऊ नका. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमांनी आवाहन केले तशी काळजी घ्या. लोकांच्या थेट संपर्कात येऊ नका आणि खबरदारी घ्या. सोबतच, खोकला किंवा शिंका आल्यानंतर रुमाल वापरणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा." असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

1101 विमानांमधील 1 लाख 29 हजार 448 प्रवाशांची तपासणी

10 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील एक लाख 29 हजार 448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशांतून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 13

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds