";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- देशात कोरोनाचा दुसरा बळी: दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचे निधन; परदेशातून परतलेल्या मुलापासून झाल होता संसर्ग

देशात कोरोनाचा दुसरा बळी: दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचे निधन; परदेशातून परतलेल्या मुलापासून झाल होता संसर्ग

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

 

नवी दिल्ली/बंगळुरू/मुंबई - काेराेना व्हायरसमुळे देशात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला हाेता. शुक्रवारी ती कोरोनाग्रस्त असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. तिला परदेशातून परतलेल्या मुलापासून संसर्ग झाला होता. मात्र, विमानतळावर स्कॅनिंगमध्ये मुलाला व्हायरसचे निदान झाले नव्हते. दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री उशिरा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. अमेरिकेत कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

हरियाणा, महाराष्ट्रात नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा ८१ वर गेला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशसह १२ राज्यांत शाळा-कॉलेज बंद केले आहेत. तथापि, परीक्षा होत राहतील. महाराष्ट्राच्या ५ शहरांत, सिनेमागृहे, पब व नाइट क्लबही बंद राहतील. केंद्राने काळाबाजार रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा अत्यावश्यक वस्तूंत समावेश केला. या वस्तूंचे उत्पादन, गुणवत्ता व वितरण सरकारच्या नियंत्रणात असेल. नियम मोडल्यास ७ वर्षांच्या कैदेची तरतूद आहे.

भारताची सज्जता अशी : येत्या ३० मार्चपर्यंत श्रीलंका, फ्रान्स व जर्मनीची विमान उड्डाणे रद्द

> लखनऊत १५ व काेलकात्यात १८ मार्चला द. आफ्रिकेविरुद्ध होणारे वनडे सामने रद्द करण्यात आले आहेत. आधी हे दोन्ही सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्याची तयारी करण्यात येत होती.

> आयपीएल आता २९ मार्चऐवजी १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. स्पर्धा १८ दिवस उशिराने सुरू होईल.

> सुप्रीम काेर्ट १६ मार्चपासून फक्त महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी करेल. वकील व पक्षकारांनाच कोर्टात जाता येईल.

> जेएनयूच्या सर्व वर्ग, परीक्षा आणि प्रायाेगिक वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. तथापि, कार्यालये सुरू राहतील. जामिया िमलिया इस्लामिया विद्यापीठातही वर्ग बंद असतील.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 14

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds