";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शहरात आढळली कोरोना संशयित महिला, 'त्या' कोरोनाग्रस्त महिलेची आहे मैत्रीण; रुग्णालयात दाखल

शहरात आढळली कोरोना संशयित महिला, 'त्या' कोरोनाग्रस्त महिलेची आहे मैत्रीण; रुग्णालयात दाखल

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

औरंगाबाद- आणखी एका महिला रुग्णाला कोरोना संशयित रुग्ण म्हणून मिनी घाटीत भरती करण्यात आले आहे. संबंधितमहिला 'त्या' खाजगी रुग्णालयात करोनाचे पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णाची मैत्रीण असल्याची माहिती समोर आली आहे. दोघीही एकाच महाविद्यालयातल्या आहेत. विशेष म्हणजे या महाविद्यालयातील हॉस्टेलमधील विद्यार्थींना क्वारेंटाइन करण्यात आले आहे. तसेच, त्यांना घरी न जाण्याचे सांगितले आहे. पॉजिटिव्ह असलेली महिला ज्या भागात गेली, त्या ठिकाणची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.

औरंगाबादेत रशिया आणि कझाकिस्तानमधून परतलेल्या 59 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

पुणे, मुंबई पाठोपाठ आता औरंगाबादेतही कोरोनाचा रुग्ण आढळला. शहरातील रुग्णालयात भरती झालेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिव्य मराठीही बोलतांना दिली. 59 वर्षीय ही महिला रशिया आणि कझाकिस्तान मध्ये गेली होती. भारतात परतल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली आहोती. यामुळे ती शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवले होते, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 38 वर पोहोचला आहे.

महिला राहत असलेल्या भागाची करणार तपासणी

महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक खाजगी रुग्णालयाला भेट देण्यास तातडीने रवाना झाले आहेत. तसेच ज्या भागात ही महिला राहत होती, त्या भागातील 3 किमी परिसरात तपासणी करण्याच्या सुचना मनपाला देण्यात येणार आहे. अशी माहिती सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. संबंधित महिलेमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांसोबत संपर्क झाला का याची तपासणी करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 38, 5 नवे रुग्ण सापडले

महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 5 नवे रुग्ण सापडले. यासोबतच, राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 38 झाली आहे. यात पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या एका नवीन रुग्णाचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना राज्यातील परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, वैद्यकीय नमुने तपासणीसाठी राज्यात लॅबची संख्या वाढवण्यात येत आहे. सोबतच, एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात 33 रुग्णांना विषाणूबाधा झाल्याचे निदान झाले तरी ते गंभीर नाहीत. यातील 18 परदेशातून आलेले असून त्यांच्यामुळे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या 14 आहे. हे संक्रमण किती पसरले आहे याची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याचे टोपे म्हणाले. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात नवी उपकरणे मागवली असून बुधवारपासून दिवसाला 350 जणांची तपासणी येथे करता येणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत मुंबई, पुण्यात नवीन लॅब सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंत्रणा सज्ज असल्याचे टोपे म्हणाले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 24

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds