";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद, औरंगाबादेत 5 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद, औरंगाबादेत 5 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई / औरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशात 179 झाली आहे. त्यातील 49 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातून आहेत. तर 2 जण व्हेंटिलेटरवर असून इतरांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात गेल्या 12 तासांत 7 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोना संक्रमाणाचे देशात 6 नवीन प्रकरण समोर आले आहेत. यात उत्तर प्रदेश, चंदीगड आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. महाराष्ट्रात शाळा आणि महाविद्यालयांचा बंद आणि बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम घोषित केल्यानंतर आता आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. तत्पूर्वी सीबीएसईने सुद्धा असाच निर्णय घेतला. सोबतच, जेईईच्या परीक्षा सुद्धा 31 मार्च नंतरच घोषित केल्या जाणार आहेत.

168 ट्रेन रद्द, डबेवाल्यांच्या सेवा बंद, तिकीट रद्द केल्यास 100 टक्के रीफंड

मुंबईत डबेवाल्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत जवळपास 5000 पेक्षा अधिक डबेवाले रोज घर आणि कार्यालयांमध्ये जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करत असतात. डबेवाला संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. तर दुसरीकडे, प्रवाशांचा घटलेला आकडा पाहता रेल्वे विभागाने 20 मार्च पासून 31 मार्च पर्यंत 168 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच, तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना आता 100 टक्के रीफंड मिळेल. सोबतच, चेन्नई विमानतळावरून 50 आंतरराष्ट्रीय आणि 34 डोमेस्टिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादेत 5 संशयितांच्या टेस्ट निगेटीव्ह

औरंगाबादमध्ये संशयित आढळलेल्या 5 जणांचा वैद्यकीय अहवाल आला. त्यामध्ये कुणालाही कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी गुरुवारी ही माहिती जारी केली. पाचही जणांचे अहवाल पुणे येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांना मिनी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यानंतर यातील 2 जणांना मिनी घाटीत, एकाला घाटीत, एकाला खासगी रुग्णालय आणि एकाला घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. दरम्यान, आता औरंगाबादमध्ये एकच कोरोनाग्रस्त असून तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसेच प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नागपूरमध्ये तीन दिवस हेअर कटिंग, सलून बंद

नागपूरमध्ये वाढत्या कोरोना व्हायरसवर लगाम लावण्यासाठी नाभिक महामंडळाने बंदचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनावश्यक दुकानदारांना बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार, नागपूर येथील हेअर कटिंग सलून व्यावसायिकांनी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीत सापडला पहिला कोरोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विटेकर यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शृंगारतळीच्या रुग्णाला कोरोना झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. या रुग्णाचे वय 50 वर्षे असून तो दुबईतून भारतात आपल्या गावी परतला होता. प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर त्याचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 26

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds