";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला

7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for NIRBHAYA

नवी दिल्ली - दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आज सूर्योदयापूर्वीच फासावर लटकवण्यात आले. निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात आली आहे. निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केले. तिहार जेलमधील क्रमांक तीनच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आहे. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची रितसर मेडिकल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चारही दोषींना फाशी झाल्यानंतर निर्भयाच्या आईने आपल्या मुलीच्या फोटोला घट्ट मिठी मारली आणि निर्भयाला अखेर न्याय मिळाला असे उच्चारले. निर्भयाला न्या मिळवून देण्यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. आजचे सूर्य माझ्या मुलीच्या नावे. देशातील तमाम महिला आणि मुलींचे देखील आभार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.

अशी झाली फाशी...

7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला. तीच निर्भया जिच्यावर 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत चार नराधम मुकेश, अक्षय, विनय आणि पवनने बलात्कार केला होता. या दोषींच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने 9 महिन्यांच्या आतच फाशीची शिक्षा सुनावली होती. 6 महिन्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर मे 2017 सुप्रीम कोर्टने देखील फाशीवर शिक्कामोर्तब केला होता. तरीही फाशी होता-होता 2 वर्षे 10 निघून गेले. कोर्टाने शुक्रवारी फाशीची तारीख निश्चित केली होती. तत्पूर्वी दोषींनी 15 तासांत 6 याचिका देखील केल्या. त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्या. यानंतर पहाटे 5 वाजता फाशी तयारी सुरू झाली. दोषींना फाशीच्या फळीपर्यंत नेण्यात आले. चौघांचे हात-पाय बांधण्यात आले. यावेळी विनय रडत होता. तरीही दोषींच्या गळ्यात फाशीचे दोरखंड टाकण्यात आले. चेहरा झाकण्यात आला आणि जल्लादाने लीवर ओढले. फाशी होताच जणू देशाला न्याय मिळाला अशी भावना सर्वच देशवासियांमध्ये होती. तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर चौघांच्या मृत्यूची माहिती जारी केली. त्याच्या 30 मिनिटानंतर डॉक्टरांनी सुद्धा तपास करून दोषींना मृत घोषित केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds