";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शब्दबद्ध अनुभूती पुस्तकरूपाने मार्गदर्शक

शब्दबद्ध अनुभूती पुस्तकरूपाने मार्गदर्शक

E-mail Print PDF

Add this to your website

SBDSD

पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांचे मत

तळेगाव दाभाडे, दि. 5 : जीवनमान घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींही खूप काही शिकवून जातात. इतरांना मार्गदर्शन व्हावे यासाठी अशा अनुभूती शब्दबद्ध करून पुस्तक रूपाने प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. डॉ. शाळीग्राम भंडारी व त्यांची कन्या सौ. सोनाली जेथलिया यांनी हे गुण आत्मसात करून एकाहून एक सुंदर पुस्तके प्रसिद्ध केल्याबद्दल पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांनी ईशा हॉठेलमध्ये झालेल्या समारंभात गौरवोद्वार काढले. डॉ. भंडारी यांचे शिदोरी व सौ. सोनाली हिची रे मनाआणि भातुकलीही दोन अशा एकूण 3 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा साजरा झाला. तेव्हा डॉ. संचेतीबोलत होते.

अध्यक्षस्थानी अंबरचे संपादक सुरेश साखवळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. यशवंत पाटणे व नगराध्यक्ष सुरेश धोत्रे उपस्थित होते. अंधगायक भूषण तोष्णीवालच्या गायनानंतर विठ्ठल काटे यांनी हास्ययोगाच्या प्रात्यक्षिकाद्वारे सभागृहात  खळखळाट केला. दीपप्रज्वलनानंतर सोनदीप प्रकाशनचे राधेश्याम भंडारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. प्रा. यशवंत पाटणे म्हणाले की, लेखक कोणती मानवी मूल्ये जतन करतो त्यावर त्याच्या साहित्याचे श्रेष्ठत्व अवलंबून असते असे साहित्य समाजाला चैतन्यशिलता देते. जीवनातील आव्हाने पेलण्याची उर्जा अशा साहित्यामधूनच मिळते.

अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील कुळी कन्यापुत्र होती जे सात्विकयावर विवेचने करून डॉ. भंडारी कुटुंबियांच्या उक्ती व कृती प्रेरक असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रा. जयंत जोर्वेकर, डॉ. दीपक शहा, सुरेश अत्रे, सौ. सोनाली जेथलिया व डॉ. शाळीग्राम भंडारी यांची ही भाषणे झाली. मुखपृष्ठ सजविणारे दिनेश फल्ले व मुद्रक अर्जुन गायकवाड यांचे सत्कार करण्यात आले. डॉ. दीपाली झंवर व राधेश्याम भंडारी यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. अशोक निकम, मुकुंदराव खळदे, हरि नारायण भुतडा, अ‍ॅड. रामसुख जेथलिया व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रीति भोजनाने समारंभाची रूचकर सांगता झाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 842

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds