";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कवी गणेश यादव यांच्या आद्याक्षरप्रधान दोन काव्यसंग्रहांचे दिमाखदार प्रकाशन

कवी गणेश यादव यांच्या आद्याक्षरप्रधान दोन काव्यसंग्रहांचे दिमाखदार प्रकाशन

E-mail Print PDF

Add this to your website

s

तळेगाव दाभाडे दि. 3 : मराठी काव्याला नवीन दिशा देणारे कवी गणेश यादव यांच्या नावात बरेच काहीनामक भाग 1 व भाग 2 या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा 1 नोव्हेंबर रोजी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांचे अध्यक्षतेखाली व आमदार संजय (बाळा) भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सीनिअर पोलीस अधिकारी सुरेश भोसले, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, मसाप मावळ शाखा अध्यक्ष सुरेश अत्रे यांचे शुभहस्ते योगीराज हॉलमध्ये संपन्न झाला.  16व्या शतकात समर्थ रामदासांनी आद्याक्षरप्रधान काव्यरचना करून छत्रपती शिवाजी महाराजांना अदिलशहा मराठी राज्यावर चाल करून येत असल्याचा संदेश दिला होता, असा इतिहास आहे. तोच हा अवघड काव्यप्रकार मराठी साहित्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न या दोन काव्यसंग्रहांार्फत कवी गणेश यादव यांनी केला आहे.

प्रकाशन सोहळ्यास टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सतीश ढमाले, माजी अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, डॉ. शाळीग्राम भंडारी, जिजामाता कॉलेज जेजुरीचे प्राचार्य नंदकुमार सागर, सावंत प्रतिष्ठान जेजुरीचे संजय सावंत, नरेंद्र परमार इत्यादी मान्यवरांसह टाटा मोटर्सधील गणेश यादव यांचा मित्रपरिवार, आप्त-स्वकीय व खूप मोठ्या रसिकांची उपस्थिती लाभली. नरेंद्र परमार यांच्या स्वागतप्रास्ताि वकानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व कै. शिवाजी मनोहर यादव यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. काव्यसंग्रह प्रकाशनानंतर कवी गणेश यादव यांनी आपल्या मनोगतात आपल्या काव्यलेखन वाटचालीची माहिती देऊन काव्यसंग्रहातील काही रचना ऐकवून रसिकांकडून दाद मिळविली.

सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात कवी गणेश यादव यांच्या काव्यक्षेत्रातील या प्रकारच्या अभिनव वाटचालीची प्रशंसा करून, काव्यलेखनाच्या पुढील प्रेरक- चैतन्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या काव्यसंग्रहामार्फत कवीने स्वत:मध्ये असलेल्या भावसमृद्धी, शब्दचातुर्य, गेयता व प्रतिभासामर्थ्याचा परिचय दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. साप्ताहिक अंबरतर्फे प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहाला विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, एस.एस.सी., एच.एस.सी. बोर्ड पुणेचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ व मसाप मावळ शाखा अध्यक्ष प्रा. सुरेश अत्रे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत. अत्यंत दिमाखात आणि भरगच्  प्रतिसादात संपन्न झालेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदिका विनया केसकर यांनी अत्यंत सुरेखपणे केले. कु. सरिता गणेश यादव या सुकन्येने आभार मानले. पसायदानाने या सोहळ्याची सांगता झाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 706

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds