";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तुकाराम मुंढे व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

तुकाराम मुंढे व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

E-mail Print PDF

Add this to your website
 
 
पुणे: कार्यक्षम IAS अधिकारी तुकाराम मुंढे व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
पुणे- कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले अधिकारी, तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या शुल्कामध्ये वाढ केल्याच्या कारणावरून ही धमकी देण्यात आली आहे.
 
याप्रकरणी पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापक अजय राजाराम चारखानकर यांनी शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजंगराव मोहिते-पाटील (रा. सुखसागरनगर, कात्रज) असे धमकी देणाऱ्या व्यक्‍तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ही व्यक्ती खरी आहे की खोटी याचा शोध घेतला जात आहे.
 
मोहिते नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहलेल्या या धमकीच्या पत्रात म्हटले आहे की, पीएमपीमध्ये तुम्ही केलेली तिकीट भाडेवाढ समर्थनीय नाही. तुम्ही केलेल्या भाडेवाडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घ्या, अन्यथा तुमचे आयुष्य उद्धस्त करु किंवा तुमच्या कुटुंबाचेही बरं-वाईट करु असे पत्रात म्हटले आहे. तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही लाच घेतल्याचे पुरावे आमच्याकडे असून ते मुख्यमंत्र्यांना आणि न्यायालयाला सादर करु, त्यामुळे भाडेवाढ तातडीने मागे घ्या, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावा, असा धमकीवजा इशाराच दिला गेला आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, तुकाराम मुंढे यांना दिलेले धमकीचे पत्रातील मजकूर जसाच्या तसा...

तुकाराम मुंडे हे एक धडाडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी जालना, नवी मुंबई, सोलापूरसह अनेक ठिकाणी जबरदस्त काम केले होते. तसेच भ्रष्टाचाराला चाप लावत लोकप्रतिनिधींना व नोकरशाहीला चांगलेच वठणीवर आणले होते. या काळात मुंढे यांनी अनेक लॉबींना दुखावले होते. त्यामुळे यातील तर काहींनी खोडसाळपणा करत मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी दिली नाही ना याची चर्चा सुरु आहे. पोलिस या अंगानेही तपास करण्याची शक्यता आहे.  
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 127

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds