";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

Kapil Shukla complained to human rights commission against Jain couple to abdicate the property latest update

नीमच : कोट्यवधीच्या संपत्तीसह तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन संन्यास घेऊ इच्छिणाऱ्या जैन दाम्पत्याविरोधात मध्य प्रदेशातील मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने यासंदर्भात मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून, यात हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

नीमचमधील सुमीत राठोड (वय ३५) आणि अनामिका राठोड (वय ३४) या जैन दाम्पत्याने कोट्यवधीच्या संपत्तीसह आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे दाम्पत्य जैन मुनी आचार्य रामलाल यांच्याकडून संन्यास्थ मार्गाची दीक्षा घेणार आहेत.

दाम्पत्याच्या या निर्णयाविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या दाम्पत्याने संन्यास घेण्याचा हट्ट सोडावा, अशी अनेकांनी मागणी केली होती.

आता त्याविरोधात नीमचमधीलच इंदिरानगरचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते कपिल शुक्ला यांनी मानवाधिकार आयोगाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. शुक्ला यांनी यासाठी मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून 23 सप्टेंबर रोजी गुजरातच्या सुरतमध्ये होणाऱ्या जैन भगवती दीक्षा सोहळ्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राज्य मानवाधिकार आयोगाने कोणतीही टिप्पणी केली नाही. पण मानवाधिकार आयोगासह चाईल्ड केअर भोपाळ आणि नीमचचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनाही पत्राद्वारे याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 148

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds