";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पवारसाहेब वस्तादी डाव टाकण्याच्या पवित्र्यात!

पवारसाहेब वस्तादी डाव टाकण्याच्या पवित्र्यात!

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

पवारसाहेब वस्तादी डाव टाकण्याच्या पवित्र्यात!

मुंबई, दि. 5 : एकोणीस साल सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांध्ये निवडणूक ज्वरबळावत चालला असून प्रत्येकाच्या आशा पल्लवित व्हायला आरंभ झाला आहे. महाराष्ट्रात सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचे लक्ष शरद पवार यांच्यावर केंद्रित झाले असून आपणच आमचे एकमेव तारणहार आहात. काहीही करा पण सत्ता मिळवून द्याचअसा हट्ट सर्वांनी पवारसाहेबांपुढे धरला आहे.

 

मुंबई, दि. 5 : एकोणीस साल सुरू होताच सर्वच राजकीय 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांध्ये मुंबई आणि दिल्ली दोन्हीही राज्ये काँग्रेसच्या हातातून गेली. सर्वांची अवस्था जलाविण मासोळीअशी झाली आहे. दिल्लीचे काय व्हायचे ते होऊ द्या. आम्हाला मुंबईच महत्त्वाची आहे. त्यामुळे 2019 साली महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळालीच पाहिजे असा दोघांचा आग्रह आहे. आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्याची ताकद फक्त पवारसाहेबांध्येच आहे याची खात्री आता काँग्रेसलासुद्धा पटली आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री व ज्यांच्या हाताला लकवा भरण्याची भाषा एकेकाळी झाली होती

ते पृथ्वीराज चव्हाण हेही पवारांच्या नेतृत्वाखाली विनम्रभावे लढण्यासाठी तयार झाले आहेत. लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. सारे रामायण पार पडून मे 2019 मध्ये केंद्रात नवे सरकार सत्तारूढ होईल. पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे अथवा आघाडीचे सरकार सत्तेवर येणार का राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे सरकार येणार याबाबतची उत्सुकता देशभर वाढली आहे. शरद पवार हे राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून मान्यता देणार, पण त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत. त्याऐवजी रामनाथ कोविंद यांची मुदत संपल्यानंतर पवार साहेबांना राष्ट्रपतिपदावर बसविण्याचे काँग्रेसने मान्य केल्याची चर्चा आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds