";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 80 औषधांवर आता बंदी

80 औषधांवर आता बंदी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 • नवी दिल्ली- बाजारात १५ वर्षांपासून विकल्या जाणाऱ्या पोटदुखी, ताप, रक्तदाब व निद्रानाशासारख्या आजारांवरील ८० औषधांच्या निर्मिती वा विक्रीची परवानगी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही. या औषधांच्या निर्मितीसाठी कंपन्यांनी राज्य सरकारकडे परवान्याचा अर्ज केला होता. राज्यांनी ते मंजूरही केले होते. आता या औषधींवर बंदी आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना ११ जानेवारीलाच छपाईसाठी पाठवली आहे.

  मंत्रालयातील सूत्रांनुसार, या औषधांवरील बंदी त्या दिवसापासूनच लागू हाेईल.ही औषधे इतर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉल्टपासून तयार हाेत असल्याने अपायकारक ठरतात.

   

  सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) अधिकाऱ्याने सांगितले, कोणतेही नवीन औषध बाजारात येण्याआधी सीडीएससीओकडून मंजुरी घ्यावी लागते. मंजुरी देण्यासाठी सीडीएससीओ औषधाची गुणवत्ता व शरीरावर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन करते. मात्र या ८० औषधांना बनवण्यासाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. स्टेट ड्रग कंट्रोलरने आपल्या पातळीवर कंपन्यांना मंजुरी बहाल केली. ही बाब आता समोर आली आहे.

  ही प्रमुख औषधे विनामंजुरीची, ती घातक असल्याचा दावा 
  > अँटिबायोटिक्स 

  सेफटॅक्लेव्ह 
  सेफग्लोब ओझेड 
  वानको प्लस

  > रक्तदाब 
  लोरॅम-एच 
  सारटेक 
  टेराम-एच

   

  > वेदना/ताप 
  निसिप कोल्ड 
  आँडम पी 
  ल्यूपिस्ट्रोन प्लस

  > अँटिफंगल 
  ऑरफ्लेज किट 
  व्हॅगिनोव्हेकट

   

  या औषधांत सॉल्ट अनावश्यक असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका असतो. सातत्याने या गोळ्या घेतल्याने रुग्णांवर त्यांचा प्रभावी परिणाम हाेत नाही.

  या औषधांची निर्मिती-विक्री करणाऱ्या कंपन्या 
  इन्टॉस, अॅबॉट, अॅरिस्टो, अल्केम, मॅनकाइंड, सिप्ला अशा अनेक कंपन्या अशा फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधे तयार करत असतात. त्यात वेगळ्या औषधी तयार करण्याची गरज पडू नये म्हणून विविध आजारांवरील औषधांना एकत्र करून एकच गोळी बनवत आहेत.

   

  विकसित देशांत अशी औषधे ठरतात गुन्हा, भारतात दुर्लक्ष 
  अशी औषधे तयार करणे हा विकसित देशांत गुन्हा आहे. मात्र भारत व इतर काही विकसनशील देशांत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. - डॉ. के.के. अग्रवाल, माजी अध्यक्ष आयएमए 

   
   
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 81

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds