";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- औरंगाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची आत्महत्या; वयाच्या 79व्या वर्षी संपवले जीवन

औरंगाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची आत्महत्या; वयाच्या 79व्या वर्षी संपवले जीवन

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

 

Aurangabad District Bank Chairman committed Suicide

औरंगाबाद :-औरंगाबाद  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सोमवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. सकाळीच बँकेचे माजी संचालक अॅड. सदाशिव गायके यांनी पाटील यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. साथीदारांकरवी पाटील यांनी हा हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा म्हणून अॅड. गायके सकाळपासून पोलिसांत पाठपुरावा करीत होते. याबाबत चौकशी सुरू असतानाच दुपारी सुरेश पाटील यांनी घरी विष घेतले. दरम्यान, रात्री गायकेंच्या तक्रारीवरून वेदांतनगर ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अॅड. गायकेंसह माजी संचालक नाना पाटील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गायकेंनी आपल्याला पिस्तुल लावणाऱ्याबद्दल तक्रारीत म्हटले आहे की ‘सुरेश पाटील, नितीन पाटील और जयराम साळुंके के कम्लेंट करता है, आज तुझे जिंदा नही छोडेंगे’, असा दम त्याने दिला. मी मोठ्याने ओरडत असल्याचे पाहून बाजूचीच एक महिलाही जोरात ओरडली. त्यानंतर जवळ राहणारे जनार्दन तांबे, रमेश तांबे मला वाचवण्यासाठी पळत आले. त्यांना हल्लेखोर कारमध्ये बसले व राँगसाईडने पळून गेले. या वेळी रस्त्याच्या उलट दिशेला सुरेश दयाराम पाटील व जयराम नाथू साळुंके हेही होते. तेही त्या कारच्या मागे मोटारसायकलवर निघून गेले. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी लोकांविरुद्ध कलम ३६३, ३४१, ५११, ५०६, ३४ व भारतीय शस्त्र कायद्यातील ४/२५ नुसार गुन्हा दाखल केला.


... पोलिसांतील तक्रारीमुळे पाटील अस्वस्थ : सुरेश पाटील सकाळी साडेदहा वाजता घरातून बाहेर पडले आणि न्यायालयात गेले. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष जयराम साळुंके होते. न्यायालयात असतानाच त्यांना अॅड. गायके यांनी आपल्या विरोधात तक्रार दिल्याचे समजले आणि ते अस्वस्थ झाले. बारा वाजता ते घरी आले आणि झोपी गेले. यावेळी घरी त्यांची पत्नी, मुलगा नितीन पाटील, नातू निशांत आणि स्नुषा होत्या. दुपारी दीड वाजता नितीन यांनी खोलीचे दार वाजवले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी पश्चिमेकडील खिडकीतून आत पाहिले. खिडकीतून आवाज दिला तरीही सुरेश पाटील उठले नाहीत. तेव्हा नितीन यांनी निशांत व शिपाई विशालच्या मदतीने दरवाजा तोडला. बेशुद्धावस्थेतील पाटील यांना कुटुंबियांनी समर्थनगरमधील साई हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, तोवर त्यांची प्राणज्योत मालवली होती.


बेडरूममध्ये चिठ्ठी, विषाची बाटली : साई हॉस्पीटलमधून पाटील यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, त्यांच्या बेडरूममध्ये चिठ्ठी, विषाची बाटली आढळल्याने कुटुंबियांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीमध्ये हलवला. पोटात विष गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, सुरेश पाटील यांच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांनीही तात्काळ पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. ज्या खोलीत पाटील बेशुद्धावस्थेत होते त्या खोलीमध्ये एक विषारी द्रव्याची बाटली, बाजूलाच झाकण, डायरी आणि एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. 
गायके, नाना पाटलांच्या विरोधात गुन्हा : रात्री ९.३० वा. सुरेश पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अॅड. सदाशिव गायके, नाना पाटील यांच्या विरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गायके व पाटील यांनी पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गायके व पाटील या दोघांनाही क्रांतीचौक पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.


गायकेंची सकाळीच तक्रार
अॅड. सदाशिव गायके यांनी सकाळी सात वाजताच वेदांतनगर पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे कळवले. पोलिस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेतली.

  • काय होते तक्रारीत? 
    सकाळी ६.४० वा. मी पदमपुऱ्यात फिरायला गेलो. मागून लाल कार आली. चालकाशेजारी बसलेली व्यक्ती व इतर दोघे उतरले. मला कारकडे नेऊ लागले. मी ओरडू लागलो तेव्हा एकाने माझ्या डोक्याला पिस्तूल लावले, अशी ही तक्रार होती.


    माझ्या मृत्यूस गायके, नाना पाटील जबाबदार
    आत्महत्येपूर्वी सुरेश पाटील यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे, की ‘सदाशिव गायके यांनी वीस वर्षांपासून माझ्या विरोधात २६ केसेस दाखल केल्या. आजही त्यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यामध्ये माझ्याविरोधात खोटी तक्रार दिली. या दोघांनी मला खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे मला जीवनाचा कंटाळा आलाय. माझ्या मृत्यूस सदाशिव गायके व नाना पाटील हेच जबाबदार आहेत.’

     
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 45

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds