";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोकसभा निवडणूक 2019 - मावळ मतदार संघ पार्थ पवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने कसली कंबर

लोकसभा निवडणूक 2019 - मावळ मतदार संघ पार्थ पवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने कसली कंबर

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 16 : मावळ लोकसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवारांचे नाव जाहीर केल्यानंतर तालुक्यातील पक्षकार्यकर्त्यांध्ये नवचैतन्य संचारले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे ते पुत्र असल्याने मावळ तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वत्र जंग जंग पछाडण्याचा निर्धार पक्षकार्यकर्त्यांनी केला आहे. पवारसाहेबांच्या घरातला माणूस मैदानात उतरला असल्याने मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी तूर्त तरी संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. याचे कारण म्हणजे लोकांचे पवार घराण्यावर प्रे आहे. सध्या उजव्यांच्या मदतीने भाजप व डाव्यांच्या मदतीने काँग्रेसकडे ध्रुवीकरणाची वाटचाल दिसून येत आहे. अशा वेळी संसदीय लोकशाहीच्या यशासाठी पार्थ पवार यांच्यासारख्या युवकांचे या क्षेत्रातील पदार्पण हे आशादायी व स्वागातार्ह आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले, पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी सर्वप्रथम आम्हीच पक्षाकडे केली होती. युवा कार्यकर्ते व सर्वच स्तरातील मंडळींना त्यांच्य उमेदवारीमुळे आनंद झाला आहे. पवार साहेबांच्या मार्ग र्शनाखाली व अजितदादांच्या विकासाच्या धोरणामुळे मावळ तालुक्यातील सर्वांगीण विकासाची कामे मार्गी लागतील याची आम्हाला खात्री आहे. मावळचा ग्रामीण भाग आजही विकासापासून वंचित आहे. या संदर्भात विद्यमान उमदेवार कुचकामी निघाले याचा आम्हाला खेद आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 25

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds