";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तर जम्मू कश्मीरची जनताही त्याच मुदतीत हिंदुस्थानशी संबंध संपवेल, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

तर जम्मू कश्मीरची जनताही त्याच मुदतीत हिंदुस्थानशी संबंध संपवेल, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for महबूबा मुफ्ती

 

जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी कश्मीरबाबत खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. केंद्रातील भाजप सरकार किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा कलम 370 किंवा 35 ए रद्द करण्यासाठी मुदत ठरवत असतील. तर जम्मू कश्मीरची जनताही त्याच मुदतीत हिंदुस्थानशी संबंध संपवेल असे त्या बरळल्या आहेत. ज्या अटीशर्तीवर जम्मू कश्मीरचे विलीनीकरण हिंदुस्थानात झाले होते, त्याच अटी पाळण्यात येत नसतील तर जम्मू कश्मीर हिंदुस्थानशी संबंध तोडेल असे त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे विलीनीकरणाच्या वेळी असलेल्या अटी पाळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 2020 पर्यंत जम्मू कश्मीरमधून कलम 370 आणि 35 ए रद्द करण्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्ती यांनी हे खळबळजनक विधान केले. त्यांच्या या विधानावरून सर्वत्र टीका होत आहे. मुफ्ती यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरूनही कडाडून टीका केली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास कश्मीरमधून सैन्याची संख्या कमी करण्यात येईल. तसेच सैन्य विशेषाधिकार कायद्याबाबत पुनर्वविचार करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये दिले आहे. ही गोष्ट मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भाजपशी युती करतानाच सांगितली होती. त्या गोष्टी काँग्रेस आता सांगत आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील या मुद्द्यावर भाजपने टीका केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना मोकळे रान मिळणार असल्याची टीका भाजपने केली होती.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 10

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds