";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळमध्ये चुरशीचे वातावरण

मावळमध्ये चुरशीचे वातावरण

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 5 : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार, कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत विजय मिळवायचाच, पराभवाची मालिका येथे खंडित करायची असा दृढनिश्चय राष्ट्रवादीने केला आहे. याउलट परिस्थितीचा सामना करायचा, काहीही झाले तरी निर्विवाद सत्ता स्थापन करायची असा निश्चय शिवसेनेने केला आहे. त्यामुळे सर्वच पक्षाध्यक्षांची, ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी मतदारसंघात दौरा केला.

 

या वेळी पार्थ पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. खुद्द राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी येथील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला. ठिकठिकाणी जाहीर सभा होत असून त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बंधू रोहित पवार आदी मंडळी प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झाली आहेत. त्यांनी सर्व मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. यावरून मावळमध्ये चुरशीचे वातावरण तयार झाले आहे.

भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या यशाने हॅट्रिक करायची आणि बारणे यांचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असा संकल्प करत भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार बाळा भेगडे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा असल्याने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. शिवाय खुद्द मोदींनीसुद्धा आपल्या भाषणात मावळाचा उल्लेख केल्याने मातब्बर मंडळींना सूचक असा इशारा मिळाला आहे.

दोन्ही उमेदवारांच्या पदाधिकार्‍यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे, हे मात्र यातून स्पष्ट झाले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 12

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds