";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- डॉक्टरांनी तेव्हा सांगितले होते, मी आता दोन दिवसही जगणार नाही; आज मी सहज गातो, भाषणही देतो : स्पर्श

डॉक्टरांनी तेव्हा सांगितले होते, मी आता दोन दिवसही जगणार नाही; आज मी सहज गातो, भाषणही देतो : स्पर्श

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

वाॅशिंग्टन - अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात व्हीलचेअरवर राष्ट्रगीत गात असलेल्या स्पर्शचा दमदार आवाज तुम्ही अवश्य ऐकला असेल. राष्ट्रगीत गाताना त्याची छाती ताठ होती आणि डोळ्यांत चमक होती. स्पर्श जन्मत:च ऑस्टो-जेनेसिस या आजाराशी झुंज देत आहे. या आजारात हाडे एवढी कमकुवत होतात की हलका दाब आला की ती तुटतात. स्पर्शचा जन्म झाला होता तेव्हा त्याची ४५ हाडे तुटलेली होती. हा मुलगा दोन दिवसांपेक्षा जास्त जगू शकणार नाही, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले होते. आता स्पर्श १६ वर्षांचा झाला आहे. त्याच्या शरीरात १३० फ्रॅक्चर झाले आहेत. शरीरात लोखंडाचे ८ राॅड आणि २२ स्क्रू लावलेले आहेत, पण मानसिकदृष्ट्या तो खूप मजबूत आहे. ‘दिव्य मराठी’शी केलेल्या चर्चेत स्पर्शने सांगितले, ‘जन्मानंतर ६ महिने आयसीयूमध्ये गेले. पुढील ६ महिन्यांपर्यंत माझ्या नाकात नळी टाकून जेवण दिले जात होते. पापा (हिरेन शहा) तेव्हा केपीएमजीमध्ये नोकरी करत होते. माझ्या देखभालीसाठी त्यांना ही नोकरी सोडावी लागली होती. उपचारावर सुमारे ३ कोटी रुपये खर्च झाले. उधारी फेडण्यासाठी वडिलांना ४ वर्षे लागली. या संघर्षात मम्मीने (जिगिशा शहा) साथ दिली. गुजराती शाळेत शिकलेल्या माझ्या मम्मीला तेव्हा इंग्रजी मुळीच येत नव्हती. पण ती इंग्रजी शिकली आणि आता तर ती जगातील अव्वल रेटिंग संस्थांपैकी एक असलेल्या ‘मूडीज’ मध्ये संचालक म्हणून काम करत आहे.’

स्पर्श सांगतो,‘ मी नेहमी व्हीलचेअरवर असतो. त्यामुळे लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आहे. संगीतातही मन रमते. मी भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे पंडित जसराज यांच्याकडून घेतले. मला अमेरिकी हिप-हाॅप विशेषत: एनएमएम आणि डी-१ ही खूप आवडते. मम्मी-पापांनी मला एवढे प्रोत्साहित केले आहे की मी आयुष्याचा भरपूर आनंद घेत आहे. सामान्य मुलांप्रमाणे शाळेत जातो. गाणे गातो आणि प्रेरक वक्ता आहे. माझा दिवस सकाळी ६.३० वाजता सुरू होतो. व्हीलचेअरवरच बाथरूमला जातो. व्हीलचेअरने एका जागेहून दुसरीकडे सहज जाता यावे यासाठी संपूर्ण घरात राफ्ट लावलेले आहेत. बसने शाळेत जातो आणि सामान्य मुलांसोबत शिक्षण घेतो. शाळेतून परतल्यावर पियानो क्लास घेतो. नंतर संध्याकाळी होमवर्क करतो. त्यासाठी मम्मी-पापा मदत करतात, कारण वह्या-पुस्तकं उचलल्यास किंवा जास्त जोर देऊन पेनने लिहिल्यास हाडे तुटण्याची भीती असते.’

वडील हिरेन शहा सांगतात, “स्पर्श साडेतीन वर्षाचा होता तेव्हापासून पियानो शिकू लागा होता. १० वर्षांचा होईपर्यंत रॅप गाऊ लागला आणि १३ वर्षांचा असताना त्याने एका वक्तृक्त स्पर्धेत इतके प्रेरक भाषण केले की सोशल मीडियावर त्याचे हे भाषण अडीच कोटी लोकांनी ऐकले आहे. याहूने स्पर्शला जगातील १० सर्वात विलक्षण मुलांपैकी एक असे विशेषण दिले आहे. आज २०० देशांतील लोक त्याला ओळखतात. त्याने ७ देशांत १५० वेळा कार्यक्रम केले आहेत. गुगल, डेलॉएट, यूएन आणि मेडिसन ग्राऊंडसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी स्पर्शने प्रेरक भाषक केले आहे.’ आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने ग्लोबल सिटीजन म्हणून सुशिक्षित व्हायला हवे, असे स्पर्श सांगतो. यासाठी मातृभाषेसोबत जगभरात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी, फ्रेंच आणि मेंडरिन अशा भाषा शिकल्या पाहिजेत. शिवाय गणितात पारंगत असले पाहिजे, असे स्पर्श सांगतो.

- शहा कुटुंबीयांनी रितेश शुक्ला यांना दिलेली माहिती.

माझ्यासारख्या लोकांसाठी विशेष व्यवस्था असावी

स्पर्श म्हणतो, माझ्यासारखी कित्येक मुले आणि वयस्कर लोक शारीरिक व्याधींमुळे आवडीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. भारतात बस, रेल्वे, विमान, सरकारी इमारती असोत किंवा नद्या, तलाव, मंदिरे असोत या सर्व ठिकाणी अशा लोकांना जाता यावे म्हणून खास व्यवस्था असावी. पर्यावरण संरक्षणासह जल व वन रक्षणासाठी मोदीजींनी विशेष प्रयत्न करावेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 65

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds