";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, अर्थातच तळेगावकर अंधारात

ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, अर्थातच तळेगावकर अंधारात

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for light

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 24 : ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट अशा दणक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने लोकांची दाणादाण उडवून दिली. वास्तविक सध्या उत्तरा नक्षत्र असून त्याचे वाहन मोर आहे. त्यामुळे फारसा पाऊस अपेक्षित नव्हता. परंतु माणसांनी ताळतंत्र सोडल्याने निसर्गानेही सोडले! खरे तर हस्त नक्षत्रात असा पाऊस पडतो. कारण तो बेडी तोडतो. त्यामुळे विजांच्या लखलखाटात

जोरदार पाऊस कोसळतो तो हस्त नक्षत्रावर, असे आजवर मानले गेले आहे. परंतु सारे समज खोटे ठरवणारा काळ आलाय खरा! मध्यरात्री पावसाचा दणका चालू झाला आणि नेहमीप्रमाणे मायबाप एमएसईबीची वीज गायब झाली. जरा काही झाले की, वीज पुरवठा बंद पडणार हे आता ठरूनच गेले आहे. हजार वेळा असे प्रकार घडत असले, तरी त्यात सुधारणा मात्र व्हायला तयार नाही. उलटपक्षी वीज मंडळाचा कारभार सारखा खालच्या थरालाच जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, आणि गंत म्हणजे पूर्वी दोन महिन्यांतून दिले जाणारे वीज बिल आता न चुकता दर महिन्याला देण्यात येते आणि बिलाची आकारणी चौपट केली

जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. घरगुती वापराच्या विजेच्या बिलाचा दर युनिटला 10 रु. असा पडत असल्याचे एका ग्राहकाने दाखवून दिले. नवी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 100 युनिटपर्यंतची वीज बिले नागरिकांना माफ करतात. मग महाराष्ट्राला काय धाड भरली आहे, असा संतप्त नागरिकांचा सवाल आहे. एक टीव्ही, एक फ्रीज, 2 पंखे व 4- 5 एलईडी दिवे असणार्‍या एका घराला वीज बिलापोटी वर्षाला 50 हजार रुपये भरावे लागतात, हे त्याने समप्रमाण दाखवून दिले. औरंगजेबाच्या जिझिया करापेक्षा एमएसईबीचा हा कर जाचक असल्याचा उद्वेग एका संतप्त ग्राहकाने केला. एवढी भरमसाठ बिले गोळा करतात

, तरी यांचे मं ळ तोट्यात का जाते? असा सवाल त्याने केला. बील भरायला उशीर झाला की, माणसे घरी पाठवण्याचा सपाटा मंडळाने सुरू केला आहे. एवढी तत्परता वीज पुरवठ्यात का नाही, असा लोकांचा प्रश्न आहे. काल (23) रात्री पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि अंधार्‍या रात्री वीज जी गायब झाली ती सकाळी सूर्य उगवल्यावर प्रकाश पडल्यानंतरच परत आली.

प्रकाशात येऊन काय दिवे लावणार? “वृथा दीपो दिवापि चहे संस्कृत वचन माहीत नाही काय? अशा शब्दांत एकाने उद्विग्नता व्यक्त केली. सारखी सारखी वीज का जाते, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर वीज मंडळाकडे नाही. हजारोवेळा हेच झाले. सारखी सारखी कारणे ऐकून पोट भरणार नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तरी आपली कारणं सारखी सांगतच आहात. सरळपणानं काम करता येत नसेल, तर जागा खाली करा अशी प्रतिक्रिया एका संतप्त ग्राहकाने व्यक्त केली.

देशभर भरपूर वीज उत्पादन होत असू कुठेही तुटवडा नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. पण याच्या उलट, वीज मंडळाचा गचाळ कारभार तळेगावकरांना सतावतो आहे. जमत नसेल तर खासगीकडे हा विषय सोपवा. चार पैसे जास्त जातील, पण सुरळीत वीजपुरवठा तरी होईल, असे मत एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केले. 23 तारखेला मध्यरात्री वीज गेली. ज्यांना परवडते अशांकडे इन्व्हर्टर होते. तोही 2-3 तास कसेबसे खुडु-खुडु चालू राहिले. नंतर तेही बंद पडले. त्यामुळे

उजाडेपर्यंत अंधारात वेळ काढावा लागला. हल्ली बायपाय सरकार रॉकेल देत नाही. त्यामुळे चिमण्या-कंदीलही वापरता येत नाहीत. विजेच्या पायी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोच, म्हणून वेळीच जागे व्हा असे लोकांचे सांगणे आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds