";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भारतीय वंशाच्या पंकजने थ्रीडी प्रिंटिंगने तयार केली सजीव त्वचा, शरीराला ती सहजपणे जुळेल, जखमेचे व्रणही राहणार नाहीत

भारतीय वंशाच्या पंकजने थ्रीडी प्रिंटिंगने तयार केली सजीव त्वचा, शरीराला ती सहजपणे जुळेल, जखमेचे व्रणही राहणार नाहीत

E-mail Print PDF

Add this to your website

 

न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ पंकज कारंडे यांनी प्रथमच रक्तवाहिन्या असलेली त्वचा थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून तयार करण्यात यश मिळवले आहे. बायोप्रिटिंगच्या क्षेत्रात हा अत्यंत महत्त्वाचा शोध मानला जात आहे. येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील संशोधक पंकज कारंडे म्हणाले, सध्या बाजारात असलेली अशी वैद्यकीय साधने जखम भरल्यानंतर सुकून जातात. नंतर ती शरिरावर वेगळ्या रुपात दिसून येतात. म्हणजेच जखमेचे व्रण अशा उपचारांत कायम राहतात. मात्र, या नव्या शोधातून तयार करण्यात आलेल्या त्वचेत रक्तवाहिन्यांमुळे इतका जिवंतपणा दिसेल की ती ओळखू येणार नाही. जखमेवर लावलेली त्वचा थ्री-डी प्रिंटेड आहे हे ओळखूच येणार नाही. एका वैद्यकीय नियतकालिकात हा शोध प्रसिद्ध करण्यात आला आहे.

येल स्कूल ऑफ मेडिसनच्या संशोधकांच्या एका चमूने ही रचना विशिष्ट प्रकारच्या उंदरांमध्ये वापरली. तेव्हा थ्री डी प्रिंटने तयार केलेली त्वचेत संवेदना जागृत झाली. शिवाय ही त्वचा उंदारांच्या पेशींशी जोडली जाऊ लागली. शिवाय या पेशींमधून पोषक घटक त्वचेला मिळू लागले. अमेरिकेतील रेनेस्सेलायर पॉलिटेक्निकचे सहप्राध्यापक असलेले कारंडे यांनी सांगितले की, भविष्यात भाजलेल्या रुग्णांमधील पेशी व रक्तवाहिन्या नष्ट झाल्या असतील तर ते आव्हान सहज पेलता येईल. पंकज कारंडे

इंडिया सायन्स फेस्टिव्हल : अॅस्ट्रोफिजिक्सच्या वर्गात १५९८ विद्यार्थ्यांचा सहभाग, नवा विक्रम दरम्यान, कोलकात्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये १५९८ शालेय विद्यार्थ्यांनी सर्वात मोठ्या अॅस्ट्रोफिजिक्सच्या वर्गात सहभाग घेऊन गिनिज विक्रम नोंदवला. सायन्स सिटीमध्ये आयोजित एका विशेष समारंभात प. बंगालमधील सुमारे २ हजार विद्यार्थी अॅस्ट्रोफिजिक्सच्या सर्वात मोठ्या वर्गात बसले. जी मुले हॉलमध्ये व्यासपीठासमोर बसली होती त्यांचीच मोजणी करण्यात आली तर ती संख्या १५९८ भरली. गिनिजच्या प्रतिनिधीने या वेळी बाल्कनीतील मुलांच्या मोजणीची परवानगी दिली नाही. गिनिज प्रतिनिधीने सांगितले की, हा एक वेगळा विक्रम आहे. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रॉफिजिक्सचे डॉ. समीर धुर्दे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 17

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds