";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तीन दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, अक्षयच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात 17 रोजी सुनावणी

तीन दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, अक्षयच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात 17 रोजी सुनावणी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

नवी दिल्ली : निर्भया हत्याकांडातील ३ दोषी मुकेश सिंह, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना फासावर लटकवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सूत्रांनुसार, विनयने दयेचा अर्ज परत मागितल्याने राष्ट्रपतींनी त्यावर विचार केलेला नाही. तो अर्ज आता प्रलंबित नाही. तिहार तुरुंग प्रशासनाने नोटीस दिल्यावर विनयने ७ नोव्हंेबरला दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे केला होता. मात्र, नंतर त्यानेच राष्ट्रपतींना पत्र पाठवून आपण असा अर्ज केला नसल्याचे नमूद केले. दुसरीकडे दोषी अक्षयने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली असून १७ डिसेंबरला त्यावर सुनावणी होत आहे. तोवर अक्षयभोवती फास आवळला जाणार नाही. दरम्यान, कायदा तज्ज्ञांनुसार, दोषी मुकेश, विनय आणि पवन यांना फाशी देण्यात आता कोणतीही अडचण राहिलेली नाही.

बचावासाठी दोषी युक्त्या वापरतात...

तीन दोषींना वेगवेगळी फाशी देण्यात आता अडचण नाही. राष्ट्रपतींकडे आता दयेचा अर्ज प्रलंबित नाही. हे गुन्हेगार कायद्याच्या मार्गात या माध्यमातून अडचणी आणतात. सरकारने ते पाळणे बंधनकारक नाही. - विराग गुप्ता, वकील, सुप्रीम कोर्ट

फाशीच्या शर्तींची पूर्तता

गृह मंत्रालयाने ४ जानेवारी २०१४ रोजी परिपत्रक काढले होते. यातील सर्व शर्ती पूर्ण आहेत. दयेचा अर्ज फेटाळल्यावर १४ दिवसांनी फाशी दिली जाऊ शकते. विनयची याचिका दिल्लीच्या उपराज्यपालांनी १ डिसेंबरला फेटाळली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तिघांना १५ डिसेंबरनंतर कधीही फासावर लटकावले जाऊ शकते. - अभयानंद, माजी पोलिस महासंचालक

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 35

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds