";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मावळ भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मावळ भेट

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for udhav

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मावळ भेट

लोणावळा, दि. 12 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकवीरा देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे त्यांच्या समवेत होते.

देवीची खणानारळाने ओटी भरून पूजा करण्यात आली. एकवीरा देवी ठाकरे कुटुंबीयांची कुलस्वामिनी आहे. वर्षातून दोन वेळा, तसेच लोकसभा, विधानसभा तसेच इतर महत्त्वपूर्ण निवडणुकांनंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना घेऊन ते एकवीरा देवीच्या दर्शनाकरिता येत असतात.

मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरे प्रथमच एकवीरा देवीला आले होते. या वेळी गडावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी ठाकरेयांना कार्ला फाटा येथे उड्डाणपुल उभारणीकरता मावळ तालुका शिवसेना व कार्ला ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

एकवीरा देवी कळस चोरी प्रकरणी यशस्वी तपास करून चोरट्यांचा शोध लावणार्‍या एस.सी.बी. टिमचा सन्मान ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, मिलिंद नार्वेकर, उपनेते, माजी आमदार अनंत तरे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, माजी जिल्हाप्रमुख मच्ंिछद्र खराडे, संपर्क प्रमुख बाळा कदम, वाहतुकसेना जिल्हाप्रमुख महेश केदारी, सुलभा उबाळे, मावळ तालुका प्रमुख राजु सांडभोर, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, भारत ठाकुर, शरद हुलावळे, दीपक हुलावळे, शिवदास पिल्ले, माणिक मराठे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 54

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds