";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सत्तारूढ भाजपसाठी धोक्याची घंटा - संगीता शेळके

सत्तारूढ भाजपसाठी धोक्याची घंटा - संगीता शेळके

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 10 : नगरपरिषद प्रभाग 7 ब मध्ये जनसेवा विकास समिती तसेच तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. संगीता राजेंद्र शेळके 795 मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे तालुक्यासह तळेगावच्या सत्तापरिवर्तनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सलग दुसर्‍यांदा धक्का दिला आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपासाठी प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवामुळे नगरपरिषदेतील भाजपचे बहुत संपुष्टात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. अपक्ष उमेदवार सौ. संगीता राजेंद्र शेळके यांनी 68 टक्के एकतर्फी मते मिळवली. त्यामुळे शेळके यांना एकूण 1,459, तर भाजपचे कृष्णा मारुती म्हाळसकर यांना 657 मतांवर समाधान मानावे लागले.

नगरपरिषदेत 2016 साली 26 पैकी 14 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुत मिळवले होते. सुनील शेळके तळेगाव दाभाडे नगरपरिषद  विजयी यांच्या पाठोपाठ संदीप शेळके यांनीही भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने संख्याबळ घटले आहे. सभागृहात बहुत टिकवण्यासाठी भाजपला पोटनिवडणुकीतील विजय महत्त्वाचा होता. मात्र ही जागा गमावल्याने विरोधकांचे पारडे जड झाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. आता त्या जागी अपक्ष उमेदवाराची वर्णी लावून आपल्या प्रयत्नातून तालुक्यासह नगरपरिषदेवरही आपली पकड घट्ट असल्याचे आमदार शेळके यांनी दाखवून दिले. आमदार सुनील (आण्णा) शेळके व सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया संगीता शेळके यांनी व्यक्त केली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 6

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds