";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- हिंगणघाटमधील घटना महाराष्ट्राच्या मातीला लाजिरवाणी घटना, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया

हिंगणघाटमधील घटना महाराष्ट्राच्या मातीला लाजिरवाणी घटना, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई - हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यातून आणि नंतर मृत्यूमधून आपण वाचवू शकलो नाही ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे अशा शब्दात आपला संताप राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला आहे. हिंगणघाट मधील बहिणीचे निधन झाल्यावर तिला श्रध्दांजली वाहताना अजितदादा पवार यांनी यापुढे कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच, खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंगणघाट प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे असेही अजितदादा पवार म्हणाले. हिंगणघाट घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल असे स्पष्ट संकेत अजितदादा पवार यांनी दिले आहेत. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाटवासियांच्या दुःखात सहभागी आहे अशा शब्दात आपला शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 48

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds