";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मी मनोरुग्ण; दोषी विनयचा दावा; विनयने स्वत:चे डोके फोडले, कोर्टाला म्हणाला मला स्किझोफ्रेनिया

मी मनोरुग्ण; दोषी विनयचा दावा; विनयने स्वत:चे डोके फोडले, कोर्टाला म्हणाला मला स्किझोफ्रेनिया

E-mail Print PDF

Add this to your website

 

नवी दिल्ली : निर्भयाचे दोषी फाशीपासून वाचण्यासाठी आपले नवनवे कायदेशीर पर्याय वापरत आहेत. आता दोषी विनयने नवाच कांगावा केला आहे. पर्याय न उरल्याने त्याने तुरुंगात भिंतीवर डोके आदळून स्वत:ला जखमी केले. याचा बहाणा करून त्याचे वकील ए.पी. सिंह यांनी गुरुवारी कोर्टात याचिका दाखल केली. त्यात म्हटले की, ‘विनय कथितपणे मानसिक आजार स्किझोफ्रेनिया, डोके व हातच्या दुखापतीने ग्रस्त आहे. बुधवारी आपण तिहारमध्ये त्याला भेटायला गेलो तेव्हा तो मला व त्याच्या आईलाही ओळखू शकला नाही. तो प्रदीर्घ काळापासून अल्प झोप घेतोय. यामुळे त्याची प्रकृती खालावली असून त्याच्यावर चांगले उपचार केले जावेत.’

यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून उत्तर मागवले आहे. याआधी विनयने तुरुंगात उपोषण केले होते. तुरुंगातील अधिकारी म्हणाले, त्याने रविवारी कोठडीतील भिंतीवर डोके आपटले होते. यामुळे तो किरकोळ जखमी झाला होता. तुरुंगातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नवा डाव : दयेचा अर्ज फेटाळण्यावेळी आचारसंहितेचे उल्लंघन

विनयचे वकील ए.पी. सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करून म्हटले आहे की, ‘दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी २९ जानेवारीला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केली होती तेव्हा ते मंत्री नव्हते ना आमदार. यामुळे दयेचा अर्ज फेटाळणे घटनाबाह्य आहे. कारण त्या वेळी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. दया अर्ज फेटाळणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.’

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 72

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds