";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- फक्त तळेगाव नव्हे तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन - सत्यशीलराजे दाभाडे

फक्त तळेगाव नव्हे तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन - सत्यशीलराजे दाभाडे

E-mail Print PDF

Add this to your website

 

तळेगाव दाभाडे, दि. 24 : केवळ तळेगाव स्टेशन ऐवजी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनअसे नाव रेल्वेच्या दस्तऐवजांवर आणि नामफलकांवर असावे यासाठी सरदार दाभाडे घराण्याचे 13वे वंशज सरदार सत्यशीलराजे दाभाडे (सरकार) यांनी केंद्रीय रेल्वेंत्री पीयुष गोयल यांना निवेदन (खलिता) पाठविला आहे. मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यस्थापनेपासून ते मराठा साम्राज्याचा गुजरातपर्यंत विस्तार करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती दाभाडे घराण्याचे मोठे योगदान आहे. श्रीमंत सरसेनापती सरदार खंडेराव येसाजीराव दाभाडे यांनी मराठा सैन्याचे सरसेनापतिपद भूषविल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांना सरसेनापतिपद बहाल करण्यात आले.

भारताच्या इतिहासात सरसेनापतिपद भूषविलेल्या उमाबाईसाहेब ह्या एकमेव महिला होत्या. सध्या उभ्या असलेल्या तळेगाव रेल्वे स्टेशनची जागा तळेगावचे तत्कालीन राजे सरसेनापती खंडेराव दाभाडे दुसरे यांनी ब्रिटिश सरकारला दान केली होती. तळेगाव दाभाडे व मावळ परिसरातील जनतेला इतर भागांशी जोडण्याकरिता, दळणवळणासाठी रेल्वेचा फायदा व्हावा हाच उद्देश त्यामागचा होता. विकासाचा द्रष्टेपणा ठेवून त्यांनीच 1984 साली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची स्थापना केली.

महाराष्ट्र सरकारच्या दस्तऐवजात तळेगाव दाभाडे अशी रात्रपत्रित नोंद आहे. मात्र रेल्वे स्टेशनच्या फलकांवर तळेगाव पुढे दाभाडे आडनाव जोडण्यात आलेले नाही. दाभाडे घराणे आणि समस्त तळेगावकरांच्या विनंतीनुसार तिकिटघर, स्टेशन मास्तर केबिन, रेल्वे पोलीस ठाणे आदी दालनांचे नामकरण तळेगावचे संस्थापक श्रीमंत सरसेनापती सरदार खंडेराव येसाजीराव दाभाडे असे करण्यात यावे. तळेगावच्या रेल्वे फलकांवर तळेगाव दाभाडे असे नाव समाविष्ट करण्यात यावे, असे सरदार सत्यशीलराजे पद्मसिंहराजे दाभाडे यांनी केंद्रीय रेल्वेंत्री पीयुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 98

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds