";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना आदरांजली

सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना आदरांजली

E-mail Print PDF

Add this to your website

 

तळेगाव दाभाडे, दि. 28 : शिवस्वराज्यातील सरसेनापती श्रीमंत खंडेराव येसाजीराव दाभाडे सरकार यांच्या 288व्या पुण्यस्मरणादिनी राजघराण्यातील तसेच दाभाडे घराण्यावर प्रे करणार्‍या ग्रामस्थांनी समाधीवर पुष्पहार अर्पण करूनश्रद्धांजली वाहिली. बुधवार 27 सप्टेंबर रोजी दाभाडे घराण्याचे वंशज अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी बनेेशर मंदिर प्रांगणातील सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण केला.

त्याप्रसंगी नगरसेवक विशाल दाभाडे, वैशाली दाभाडे, मंगला जाधव, शामराव दाभाडे, ह.भ.प. माऊली दाभाडे, केशवराव दाभाडे, बिजेंद्र किल्लावाला, अ‍ॅड. विनय दाभाडे, प्रमोद बोर्‍हाडे, अनिल धर्माधिकारी, दिलीप डोळस, नितीन खळदे, प्रमोद दाभाडे,नलेश गराडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सत्येंद्रराजे दाभाडे यांनी सरसेनापती श्रीमंत दाभाडे यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण देत त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. माऊली दाभाडे, अनिल धर्माधिकारी, विनय दाभाडे, प्रमोद बोर्‍हाडे आदी मान्यवरांची मनोगते झाली. आभार नगरसेवक विशाल दाभाडे यांनी मानले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds