";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- रोटरीच्या वतीने दुर्गम भागात वॉटर फिल्टर

रोटरीच्या वतीने दुर्गम भागात वॉटर फिल्टर

E-mail Print PDF

Add this to your website

 

रोटरीक्लब ऑफ तळेगाव दाभाडेने सामाजिक कार्यात पुढाकार घेत मावळातील दुर्ग भागातील शिरदे, सोवडी, भाजगाव व करंजगाव या चार गावांतील शाळा तसेच संपूर्ण गावासाठी आवश्यक उच्चतंत्रज्ञानाने युक्त वॉटर फिल्टर बसविले. रोटरीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवार 23 सप्टेंबर रोजी आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते शिरदे येथे सकाळी 9.30 वाजता संपन्न झाला. सर्व ग्रामस्थांच्या वतीने रोटरी पदाधिकारी, सदस्य व आमदार भेगडे यांचे मिरवणूक काढून सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून स्वागत करण्यात आले. सभास्थानी श्रीफळ वाढवून उपक्रमाचे उद्घाटन करताना भेगडे म्हणाले की, दुर्ग भागाचा विकास तसेच त्यांच्या आरोग्याची सेवा खर्‍या अर्थाने रोटरीच्या माध्यमातून होत असल्याने स्वच्छ व शुद्ध पाण्याची व्यवस्था या चारही गावांसाठी करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले व अभिनंदन केले. स्वत: मीही रोटरीयन असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी नमूद केले व त्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

रोटरीच्या वतीने दुर्ग भागात वॉटर फिल्टर रोटरी अध्यक्षा रो. महेश महाजन यांनी (पान 1 वरून) शिरदे गावची आंतरराष्ट्रीय रोटरीकडे आर.सी.सी. व्हीलेज म्हणून नोंद झाल्याची सांगून भविष्यात यापेक्षाही मोठे व उपयुक्त उपक्रम या गावासाठी राबविणार असल्याचे सांगितले. ज्यामध्ये गोबर गॅस प्लँट, हातसडीचा तांदूळ प्रकल्प, मत्स्यशेती आदी उपक्रमांचा समावेश असल्याचे जाहीर केले. माजी अध्यक्ष रो. यादवेंद्र खळदे यांनी यासाठी आवश्यक मदत करण्याचे जाहीर केले. मुस्कान फाउंडेशन लंडन, रोटरी क्लब पुणे वेस्ट व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या संयुक्त उपक्रमास रोटरी पुणे वेस्टचे अध्यक्ष रो. विेशास सप्रे, उपाध्यक्ष चारू क्षोत्री, संतोष मराठे, अनिल बाकले, दीपक वालोकर, यादवेंद्र खळदे, विेशनाथ मराठे, विलास जाधव, अशोक काळोखे, जयंत देशपांडे, संजय शहा, भालचंद्र लेले, अतुल शहा, धनंजय मथुरे, सूर्यकांत पुणे तसेच अध्यक्ष रो. महेश महाजन, उपाध्यक्ष रो. बाळासाहेब चव्हाण, दोन्ही क्लबचे समन्वयक मा. अध्यक्ष दीपक शहा आदी उपस्थित होते. प्रकल्पपूर्तीसाठी रो. विलास शहा, अरुण बारटक्के आदींनी अथक परिश्रम घेतले. महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. निता काळोखे या प्रसंगी उपस्थित होत्या. उपाध्यक्ष रो. बाळासाहेब चव्हाण यांच्या आभारप्रदर्शनानंतर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित स्नेहभोजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 10

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds