";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- वना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबतच्या खोडसाळ व खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करू नये,

वना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबतच्या खोडसाळ व खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करू नये,

E-mail Print PDF

Add this to your website

 

तळेगाव दाभाडे, दि. 3 : पिंपरीचिंचवड महानगरपालिकेने पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबतच्या खोडसाळ व खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करू नये, तर तज्ज्ञ अभ्यासगटाने 2012मध्ये शासनाकडे सादर केलेला अहवाल सादर करावा, असे आवाहन पुणे जिल्हा भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड मनपाने पवना धरणात असणार्‍या 8.51 टी.एम.सी. उपयुक्त पाणीसाठा वाटपाच्या हिशोबाची आकडेवारी फसवी दिली आहे. सदर हिशोबात उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा सुारे 2 टीएमसी जास्त कसे दाखवले? शिवाय त्यात काही ग्रामीण, देहुरोड कँटोन्मेंट पाणी योजना शिवाय 15 हजार एकर शेती क्षेत्रासाठीच्या पाणीवाटपाचा समावेश केलेला नाही.

म्हणून मनपाने पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा व वाटपाची संपूर्ण माहिती पाटबंधारे खात्याकडून घेऊन जनतेपुढे मांडावी असे शेलार यांनी आवाहन केले. भारतीय किसान संघाने बंद जलवाहिनी विरोधात उच्च न्यायालयात सादर केलेली जनहित याचिका फेटाळलेली नाही, तर प्रथम ती जलसंपदा नियमन प्राधिकरणाकडे दाखल करण्यास सांगितले. उगीचच दिशाभूल करू नये. या शब्दांत शेलार यांनी खडसावले. मनापाची लोकसंख्या 2031 पर्यंत 29 लाखावर जाईल असे म्हटले जाते. पण पवनेकाठच्या गावांची व शहरांची वाढणारी लोकसंख्या मनपाने विचारात घेतली नाही. मनपा एकीकडे बंद जलवाहिनीअभावी अशुद्ध पाणी मिळते असे म्हणते तर पवना बंद जलवाहिनी - खोडसाळ बातम्या देऊन दिशाभूल नको दुसरीकडे मनपाच्याच चालू (सन 2016-17) वर्षातील पर्यावरण अहवालात पाण्याची शुद्धता उत्तम असल्याचे म्हटले आहे. म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी जाणूनबुजून खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत.

तसेच पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत दरडोई दरदिन 160 ते 180 ली. पाणी तर मावळातील जनतेसाठी 40 ते 50 ली. पाणी असा हिशोब मांडला आहे. उलट मावळात पशुधनामुळे शहरापेक्षा पाणी हिशोब जादा हवा. बंद जलवाहिनीमुळे सुारे 2 कोटी वीज खर्च वाचेल. असे मनपाचे म्हणणे आहे. परंतु बंद जलवाहिनीमुळे सध्याचे पवन वीजनिर्मिती केंद्र बंद होऊन वार्षिक 12 ते 15 कोटीचे नुकसान होणार आहे. पाणी देण्यास भा. कि. संघ व मावळ जनतेचा विरोध नाही. सध्याप्रमाणे रावेत बंधार्‍यातून उचलावे अथवा गंहुजे येथे बंधारा बांधावा व तेथून पाणी उचलावे. अशी सूचना शेलार यांनी केली.

परंतु बंद जलवाहिनी प्रकल्पास मावळातील शेतकर्‍यांचा विरोध कायम असणार आहे आणि मावळचे आमदार बाळा भेगडे हे शेतकर्‍यांसोबतच आहेत. तज्ज्ञ अभ्यासगटाने तर स्पष्ट म्हटले आहे की पवना बंद जलवाहिनी सर्वदृष्टीने अनावश्यक आहे. असे सांगून शेलार म्हणाले की या तज्ज्ञ अभ्यासगटात जल व भूगर्भशास्त्र तज्ज्ञ कै. डॉ. मुकुंद घारे, शिक्षणतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञ डॉ. द. ना. धनागरे, कायदा अभ्यासक डॉ. जया सागडे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, जलनियोजन तज्ज्ञ श्रीपाद धर्माधिकारी यांचा समावेश होता. प्रकल्पास पाठिंबा असणारे (पिं-चिं.मनपा) व विरोध असणारे (मावळ जनता व भा. कि. संघ) या दोन्हीही बाजूंचे सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपला अहवाल शासनाकडे दिला आहे. बंद पाइप लाइनमुळे पवना प्रवाहातील पाण्याचे प्रमाण बरेच कमी होणार आहे. परिणामी विहिरीचा जलस्तर खालावेल व प्रदूषणाची पातळी व तीव्रता वाढेल. शेती, पिण्याचे पाणी व मत्स्यव्यवसाय यावर वाईट परिणाम होतील. वीजनिर्मितीत घट होणार आहे

असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. पिं-चिं मनपास प्रदूषणविरहित जसे पाणी मिळायला हवे तसेच ते मावळलाही मिळायला हवे. बंद पाइप लाइनमुळे ते शक्य नाही असे अहवालात म्हटले आहे. म्हणून बंद जलवाहिनी प्रकल्प न राबविता पवना नदी प्रवाही व स्वच्छ ठेवण्याची योजना हवी. कुठल्याही प्रकल्पाचा लाभ व हानीचा हिशोब आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, पर्यावरण असा सर्वांगाने होणे गरजेचे आहे असे तज्ज्ञ अभ्यासगटाने स्पष्ट म्हटले आहे. म्हणून या अभ्यासगटाचा अहवाला पिं-चिं. मनपाने जनतेसमोर ठेवावा. भूलथापांना थारा राहणार नाही, असे शेलार यांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 89

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds