";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आमदारकीचे तिकिट कुणाला मिळणार?

आमदारकीचे तिकिट कुणाला मिळणार?

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

आमदारकीचे तिकिट कुणाला मिळणार?

वडगाव मावळ, दि. 19 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे 2019 हे वर्ष सुरू झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून कुणाला संधी मिळणार याबद्दल जोरदार खलबते सुरू झाली आहेत. खासदारकी हा विषय फारसा जिव्हाळ्याचा नसला तरी आमदारकी या विषयाला विलक्षण प्राधान्य आले आहे. ती दिल्ली गेली खड्ड्यात, आम्हाला मुंबईशीच खरे देणे-घेणे आहे’, अशी भावना स्पष्ट होताना दिसते. गेली 25 वर्षे भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला राहिलेला मावळ तालुका 2019 साली कुणाच्या गळ्यात माळ घालणार याबद्दल चर्चा-उपचर्चांना ऊत आलेला आहे.

मावळ तालुका काँग्रेसचा मानला जात असे, पण 1995 च्या निवडणुकीत मदन बाफनांचा पराभव करून रूपलेखा ढोरे आमदार झाल्या आणि मावळात कमळ फुलले! बाफना का पडले व ढोरेबाई कशा निवडून आल्या याची रुचकर चर्चा जुन्या जाणकारात आजही ऐकायला मिळते. परंतु 1995 सालापासून आजपर्यंत मावळ तालुक्यातून भाजपचाच आमदार निवडून येत आहे. वास्तविक शरद पवारांना मानणार्‍या दिग्गजांची मांदियाळी याच तालुक्यातील, परंतु एकमेकातले मतभेद निवडणुकीत मजबूत काम करतात अन् पवारसाहेबांनी दिलेला राष्ट्रवादीचा उमेदवार हटकून मावळात पडतो असे आजवरचे चित्र आहे यात बदल होणार का? ते बघावे लागेल. रूपलेखा ढोरे यांच्यानंतर वारकरी संप्रदायाचे दिगंबरशेठ भेगडे दोन वेळा आमदार झाले. त्यानंतर विद्यमान आमदार 

संजय ऊर्फ बाळा भेगडे हेही दोन वेळा आमदार झाले आणि मावळात भाजपच्या आमदारकीची सिल्व्हर ज्युबिलीझाली. ऑक्टोबर 2019च्या दरम्यान विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. लोकसभेचा काय निकाल लागतो त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद पवारांचे एकूण धोरण पाहता लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व राष्ट्रवादीची युतीच होणार अशी खात्री राजकीय अभ्यासक देत आहेत. साहजिकच मावळातून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार असे बोलले जाते. भाजपातर्फे विधानसभा आमदार बाळा भेगडे तिकिट मिळवून आमदारकीची हॅट्रिक करणार का? मावळातून आजवर कुणालाच हॅट्रिक करता आलेली नसल्याने बाळा भेगडेंच्या नशिबात ते सुख आहे का? ते पाहावे लागेल.याच पक्षातील सुनील शेळके व रवींद्र अप्पा भेगडे यांनीही जबरदस्त आव्हाने उभी केली आहेत. तालुक्यातील खेडोपाडी फिरून प्रचंड कामे या दोघांनी उभी केली आहेत. त्यामुळे बाळा भेगडेंना डावलून पक्षश्रेष्ठी सुनील शेळके अगर रवींद्र भेगडे यांना तिकिट

देणार का? तिकिट न मिळाल्यास बंडखोर होणार का? बंडखोरी झाल्यास कुणाचा फायदा होणार? याचे अंदाज बांधले जात आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दान कुणाच्या पदरात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. धडाडीचे कार्यकर्ते व समर्थ उमेदवार म्हणून बापूसाहेब भेगडे यांचे नाव चर्चेत आहे. संत तुकाराम साखर कारखान्यांचे ते उपाध्यक्ष आहेत. उभा बालविकासचे विद्यार्थी पोहोचले पोलीस स्टेशनला (पान 1 वरून) मावळ त्यांनी पिंजून काढला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा म.स.बँकेचे संचालक व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे यांनीही तयारी केलेली आहे. आता भेगडे की नेवाळे हे अजितदादाच निश्चित करतील असे सांगितले जाते. पाहू या 2019 साल काय करते ते!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 47

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds