";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- राधाकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा विस्तार

राधाकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा विस्तार

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे (स्टेशन), दि: 21 : भालेराव कॉलनीमधील श्री राधाकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा नगरपालिकेतर्फे विस्तार करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे व विद्यमान नगराध्यक्ष सौ. चित्रा जगनाडे यांच्या हस्ते झाले. विद्यमान सभामंडळाच्या उत्तरेस व दक्षिणेस प्रत्येकी 300 चौ. फूट वाढीव बांधकाम होणार असून एकूण सभामंडप त्यामुळे 1000 चौ.फूट होणार आहे. विस्तारित बांधकामाचा खर्च 14 लक्ष कै. सरूबाई ज्ञा. काळोखे स्मरणार्थ अशोक ज्ञा. काळोखे यांच्याकडून समर्पित तळेगाव वृत्त राधाकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा विस्तार 40 हजार रुपये असून तळेगाव नगरपालिकेतर्फे हे काम 120 दिवसात पूर्ण करण्यात येईल. नवीन सभामंडपात 500 ते 700 भक्त बसू शकतील व त्यामुळे मोठी सोय होईल, असे आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास काळे यांनी सांगितले. या मंदिरात कृष्णजन्म, गणेशजन्म व दत्तजन्म सोहळा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर म्हणाले की, सद्गुणांची प्रेरणा मंदिरातील देवदर्शनामुळे होत असल्याने पहिले ते हरिकथा निरूपणअसे म्हटलेले आहे. गावातील अन्य मंदिरांची कामेही पालिकेने अशाच प्रकारे हाती घ्यावीत. पालिका सभागृह नेते सुशील सैंदाणे म्हणाले की, सत्तेवर आल्यापासून विकास कामांचा आम्ही धडाका लावला आहे. रस्ते, पाणी, कचरा, गटारे आदी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तळेगावकर नागरिकांचा एकही प्रश्न शिल्ल्क राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. या वेळी सुलोचनाताई आवारे, सौ. चित्राजगनाडे यांनीही विचार मांडले. सौ. विभावरी दाभाडे यांनी आभार मानले. उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, संदीप शेळके, अ‍ॅड. श्रीराम कुबेर, रोहित लांघे, सौ. कल्पना भोपळे, सुनील कारंडे, संतोष शिंदे, संध्या भेगडे, अनिता पवार, प्राची हेंद्रे, शोभाताई भेगडे, सौ. हेलता खळदे हे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे अ‍ॅड. रवींद्र दाभाडे, चंद्रकांत सावंत, शरद डावखर, राशी चढ्ढा, अ‍ॅड. निवृत्ती फलके, तुकाराम बांदल, डॉ. अजित माने, सोनाथ खोले, प्रदीप बुरांडे, मधुकर शिंदे, चंद्रकांत ठक्कर, अमृतभाई शहा, मधुकर कुलकर्णी, येवतीकर, रिपब्लिकन नेते सुनील पवार व अन्य उपस्थित होते.


Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 56

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds