ब्राह्मणसंघाच्या मुंबईच्या आंदोलनात तळेगावचे सदस्य सहभागी

Tuesday, 29 January 2019 09:56 pragati
Print

Add this to your website

 

 

तळेगाव, दि. 25 : ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील विविध ब्राह्मण संघांनी व पदाधिकार्‍यांनी मंगळवार, दि. 22 जानेवारी 2019 रोजी मुंबईच्या आझादn मैदानावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. या  आंदोलनात तळेगाव-दाभाडे येथील ब्राह्मण सर्व सेवा संघाचे अध्यक्ष माधवराव जोशी यांच्यासह विजयराव कुलकर्णी, डॉ. शाम जोशी, विजयराव देशपांडे, सुधाकरराव देशमुख, उमाकांतजी कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी व शरदराव गोर्‍हे यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून आंदोलनास पाच हजारावर कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनात प्रख्यात ज्योतिषी भगरे गुरुजी, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी, पुण्याच्या वेदभवनचे मोरेेशर घैसास, सच्चिदानंद शेवडे, आमदार गोवर्धनजी शर्मा, आमदार जयदत्त क्षीरसागर, आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिकाचे भालचंद्र कुलकर्णी आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. दुपारी दोन वाजता आंदोलन संयोजकांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयात गेले, त्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेतले जातील, असे ओशासन दिले असल्याचे शिष्ट मंडळातील नेत्यांनी आंदोलनस्थळी जाहीर केले. नंतर सामुदायिक पसायदानाने आंदोलनाचा समारोप झाला.

Share