";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- बाळशास्त्री जांभेकर 207वी जयंती ब्रिटिशांच्य पिळवणुकीविरुद्ध लढणारा निर्भीड पत्रकार

बाळशास्त्री जांभेकर 207वी जयंती ब्रिटिशांच्य पिळवणुकीविरुद्ध लढणारा निर्भीड पत्रकार

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 20 (वार्ताहर) : निर्भीड पत्रकारितेची पायाभरणी आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली असून या पत्रकारितेची आजही गरज असल्याचे प्रतिपादन तळेगाव शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सोनबा गोपाळे यांनी केले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या 207 व्या जयंतीनिमित्त तळेगाव शहर पत्रकार संघाने साप्ताहिक अंबरच्या कार्यालयात आयोजित केलेल्या अभिवादन सभेत गोपाळे बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष सुनील वाळुंज यांच्या हस्ते आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,

तर साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, सचिव अतुल पवार, पत्रकार तात्या धांडे, बी.एम. भसे, मनोहर दाभाडे, फोटोग्राफ श्रीकांत चेपे, संजय कसाबी, सचिन राऊत, प्रगती रुकारी आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना गोपाळे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात इंग्रजी सत्तेचे साम्राज्य संपूर्ण भा तभर पसरलेले होते. त्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भारतीयांची पिळवणूक होत होती.

संपूर्ण भारतीय समाज हा रूढी-परंपरा, अंधश्रद्धा यांनी पोखरला होता. या समाजात जनजागृती करण्यासाठी आणि इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बाळशास्त्री यांनी 6 जानेवारी 1932 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पणसुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला भारतीयांची एकजूट वाढविण्य साठी विशेष प्रयत्न केले जांभेकर यांनी सतीची चाल, बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांची दयनीय अवस्था यावर दर्पणमधून आवाज उठवला. समाजातील अंधश्रद्धा,

रूढी, परंपरा, चालीरीती याबाबतही जनजागृती करण्याचा प्रयत्न दर्पणच्या माध्यमातून केला बाळशास्त्री जांभेकर हे अष्टपैलू व्यक्त मत्त्व असलेले पत्रकार होते. त्यांचा गणित, ज्योतिष, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, न्यायशास्त्र मानसशास्त् , इतिहास याचा सखोल अभ्यास होता. ते मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराथी, कानडी, तेलगु, हिंदी या भारतीय भाषांबरोबर इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटीन या भाषा जाणणारे पंडित होते. त्यांचा प्राचीन लिप्यांचा अभ्यास चांगला असल्याने ते महाराष्ट्रातील शिलालेख आणि ताम्रपटाचे वाचनही करीत असत. या वेळी संपादक सुरेश साखवळकर आपल्या भाषणात म्हणाले की,

स्त्रियांना वेदांचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा क्रांतिकारक विचारांचे ते पुरस्कर्ते असल्याने सामाजिक बहिष्काराला त्यांना तोंड द्यावे लागले. महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांनी बाळशास्त्रींपासून प्रेरणा घेतली. दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड, केरूनाना छत्रे आदी नेते त्यांचे विद्यार्थी होते. आज मराठी पत्रकारितेचा जो प्रचंड विस्तार झालेला आहे त्याचा पाया बाळशास्त्रींनीच घातला. या कार्यक्रमास पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सुनील वाळुंज, सचिव अतुल पवार यांनी केले होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 18

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds