";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली

भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली

E-mail Print PDF

Add this to your website

भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली 

 

तळेगाव दाभाडे, दि. 1 : तळेगाव दाभाडे शहरात भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रकल्प आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागल्याबद्दल लोक समाधान व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ही भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे तळेगाव दाभाडे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ही महत्वाची योजना मंजूर केल्याबद्दल तळेगावकर जनतेच्या वतीने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे विशेष आभार मानतो, असे भेगडे म्हणाले.

या योजनेसाठी एकूण 73 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 15 टक्के म्हणजे 11 कोटी एक लाख 45 हजार रुपये खर्च तळेगाव दाभाडे नगर परिषदेला करावा लागणार आहे. उर्वरित 85 टक्के म्हणजे 62 कोटी 41 लाख 55 हजार रुपये अनुदान राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत तीन मैलाजल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातील पहिल्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 2.45 दशलक्ष लिटर, दुसर्‍या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 2.20 दशलक्ष लिटर,

तर तिसर्‍या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 9.70 दशलक्ष लिटर इतकी असणार आहे. त्यामुळे शहरातील 14.35 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. कार्यादेश निघाल्यापासून दोन वर्षांध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, असे शासकीय आदेशात म्हटले आहे.या योजनेला मंजुरी देताना शासनाने नगर परिषदेच्या कामकाजाचे एक वर्षात पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य केले आहे.

त्यात ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद संगणकात करणे बंधनकारक आहे. उचित उपभोक्ता कर लागू करून किमान 80 टक्के करवसुली करण्याची अट आहे. नगरपालिका क्षेत्रातील मिळकतकराचे पुनर्मूल्यांकन प्रकल्प मंजुरीपासून एक वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली पहिल्या वर्षात 80 टक्के तर त्या पुढील वर्षी 90 टक्के करण्याची अटही शासनाने घातली आहे. घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे नगर परिषदेवर बंधनकारक राहील. कोणत्याही कारणास्तव प्रकल्पखर्चात वाढ झाली तर त्याची जबाबदारी नगर परिषदेवर राहील, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 32

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds